जेवढ्या कालावधीमध्ये इतर रिटेल स्टोअर एक वस्तू विकतात, तेवढ्याच वेळेत डी-मार्ट दोनदा विकून तिसऱ्याची तयारी करते भारताचा रिटेल बाजार जगातील सर्वात स्पर्धा बाजारांपैकी एक आहे. यामध्ये वॉलमार्ट, अॅमेझॉन आणि रिलायन्स रिटेलसारख्या महाकाय कंपन्या गळेकापू स्पर्धेत व्यग्र आहेत. या बाजारात किशोर बियाणी आणि सुनील मित्तल यांच्यासारख्या दिग्गज उद्योजकांनाही नाकात दम आणला आहे. अशा खडतर बाजारात राधाकिशन दमानी यांनी आपल्या रिटेल बाजाराची केवळ स्वतंत्र ओळख निर्माण केली नाही तर ते कमालीचा यशस्वी व्यवसायही करत आहेत. याचे श्रेय त्यांच्या अद्वितीय बिझनेस मॉडेलला जाते. कंपनी नफ्यावर नव्हे तर व्हॉल्यूमवर भर देते. ते टीव्ही, फ्रिज, दागिने किंवा फर्निचरसारख्या उच्च किमतीच्या वस्तू विकत नाहीत तर दैनंदिन वापरातील वस्तू विकतात. अशा वस्तू लवकर विकतात. डीमार्टमध्ये दररोज डिस्काउंट देऊ केला जातो. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात ग्राहक आकर्षित होतात आणि विक्री जास्त होते.

डीमार्टमध्ये सामग्री जवळपास ३० दिवसांत विकते. इतर कंपन्यांमध्ये सामग्री विकण्यास ७० दिवसांचा अवधी लागतो. म्हणजे, जेवढ्या वेळेत स्पर्धक कंपन्या एक वस्तू विकू शकतात, डीमार्टने दोन वस्तू विकलेल्या असतात आणि ते तिसरी विकण्याच्या प्रक्रियेत असतात. कंपनी पुरवठादारास ७ ते १० दिवसांत पेमेंट करते. स्पर्धक कंपन्या आपल्या पुरवठादारास २० ते ३० दिवसांत पेमेंट करतात. यामुळे डीमार्टला पुरवठ्यातून आणखी चांगली सूट मिळते. याशिवाय डीमार्टने जिथे स्टोअर उघडली ते त्यांची स्वत:ची आहेत. यामुळे भाड्याची बचत होते.

चार वर्षांत १२.२ पट वाढले अॅव्हेन्यू सुपरमार्ट्‌सचे एमकॅप
डीमार्ट स्टोअर्स संचालित करणारी कंपनी अॅव्हेन्यू सुपरमार्ट्‌सचा आयपीओ २०१७ मध्ये ८ ते १० मार्चदरम्यान खुला झाला होता. कंपनीचा शेअर मुंबई शेअर बाजारात २१ मार्च २०१७ रोजी आयपीओ किंमत २९९ रुपयांच्या तुलनेत १०२% उसळीसह ६०४.४० रुपयांवर लिस्ट झाला. बुधवारी हा ३,६५१.५५ रुपयांवर बंद झाला आणि कंपनीचे बाजार भांडवल २,३६,५३८.१७ कोटी रुपयांवर पोहोचले. चार वर्षे पाच महिन्यांच्या अवधीत कंपनीचे बाजार भांडवल १२.२ पट वाढले आहे. या कारणामुळे दमानींची एकूण संपत्ती वाढली आणि त्यांचा टॉप-१०० श्रीमंतांमध्ये समावेश झाला आहे.

यशस्वी व्यवसाय थाटल्यानंतरही शेअरमध्ये गुंतवणूक
अॅव्हेन्यू सुपरमार्ट‌्सच्या यशानंतरही दमानी यांनी शेअर बाजारापासून विभक्त केले नाही. ते अद्यापही डझनपेक्षा जास्त कंपन्यांचे एक टक्क्यांपेक्षा जास्त शेअर बाळगणाऱ्या गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. ते असे करणारे कदाचित भारताचे एकमेव व्यावसायिक असावेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post