रंगीत फळे-भाज्या आहारात समाविष्ट केल्यास हृदयविकाराचा धोका 30% पर्यंत होईल कमी


 

रंगीत फळ आणि भाज्यांचे सेवन करणे मेंदूसाठी फायद्याचे ठरू शकते. फळ, भाज्यांना चमकदार रंग देणारे केमिकल-फ्लेवनॉइड्स विसराळूपणा रोखू शकतात. वाढत्या वयाच्या लोकांमधील गोंधळाची स्थिती दूर करण्यात यांची महत्त्वाची भूमिका आहे. जवळपास एक लाख लोकांवर करण्यात आलेल्या संशोधनात फ्लेवनॉयडशी संबंधित आहार, शारीरिक हालचाली, दारूचे सेवन, वय आणि वजनावर लक्ष ठेवण्यात आले. हे घटक म्हातारपणातील विसराळूपणाच्या (डिमेन्शिया) धोक्याशी संबंधित आहेत. न्यूराॅलॉजीमध्ये प्रकाशित संशोधनात शास्त्रज्ञांनी सामान्यत: सेवन केल्या जाणाऱ्या २४ प्रकारच्या फ्लेवनॉइड्सच्या आधारे निष्कर्ष काढला आहे. गाजरात कॅरोटीन, स्ट्राॅबेरीत फ्लेवोन, सफरचंदात अँथोसियानिन आढळते. हॉर्वर्ड टीएचचान पब्लिक हेल्थ स्कूलच्या मते, लहानपणापासून भरपूर फ्लेवोनॉयड असलेला आहार मेंदूसाठी महत्त्वाचा आहे. इतकेच नाही तर यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोक होण्याचा धोकाही ३० टक्क्यांपर्यंत कमी होतो.

फळ-भाज्यांचा पचनक्रियेवर परिणाम
निरोगी शरीरासाठी पचनक्रिया चांगली असणे खूप गरजेचे आहे. तसेच चांगले पचन होण्यासाठी आहारात फायबर खूप महत्त्वाचे आहे. पालक, कोबी आदी हिरव्या भाज्यांत मोठ्या प्रमाणात फायबर आढळते. याशिवाय यामध्ये फोलेट, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन ए देखील असते. जॉन हॉपकिन्स मेडिसिन इन्स्टिट्यूटच्या मते, पालेभाज्यांत आढळणारी विशेष प्रकारची साखर आतड्यांमध्ये आढळणाऱ्या चांगल्या बॅक्टेरियाचे प्रमाण वाढवते.

रोज ८०० ग्रॅमपर्यंत फळ-भाज्या खा
हाॅर्वर्ड टीएचचान स्कूलच्या मते, जे लोक दिवसातून जवळपास ८ सर्व्हिंग म्हणजेच ८००-९०० ग्रॅम फळे आणि भाज्यांचे सेवन करतात त्यांच्यात कमी फळे आणि भाज्या (सुमारे १७० ग्रॅम) खाणाऱ्या लोकांच्या तुलनेत हृदयविकाराचा झटका व स्ट्रोकचा धोका जवळपास ३० टक्क्यांपर्यंत कमी होतो.

फ्लेवनॉइड सर्वात महत्त्वाचा घटक आहे
सफरचंद, गाजर, द्राक्षे, स्ट्रॉबेरी, सीताफळ आणि पालक, कांदा, पत्ता कोबी, गदड रंगाच्या भोपळ्यासह अनेक फळांमध्ये फ्लेवनॉइड्स आढळतात. पत्ता कोबी, स्ट्रॉबेरी, रंगीन भोपळा आणि कच्च्या पालकाच्या अधिक सेवनाने मेंदू अधिक तल्लख होतो. कांदा, द्राक्षे आणि सफरचंदही फायद्याचे आहे.

तोंड, घसा, पोट, स्तन कॅन्सरपासून बचाव
अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर कॅन्सर रिसर्चच्या मते, ब्रोकोली, कोबी, लसूण, कांदा, सलाड पत्ता (लेट्यूस) आणि इतर भरपूर स्टार्च असलेल्या पालेभाज्यांच्या सेवनामुळे तोंड, घसा, पोट आणि स्तन कर्करोगासारख्या अनेक गंभीर कॅन्सर रोगांपासून बचाव करण्यामध्ये मदत मिळते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post