अत्याचाराच्या गुन्ह्यात तपासी अधिकार्‍यावर ठपका पोलीस अधिक्षकांना योग्य कारवाई करण्याचे न्यायालयाचे आदेश


माय वेब टीम  

हमदनगर - कर्जत पोलीस ठाण्यात (Karjat Police station) दाखल असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यात तपास व्यवस्थित केला नसल्याने तपासी अधिकार्‍यावर (investigating officer) ठपका ठेवत या गुन्ह्याबाबत योग्य कारवाई करावी, असे आदेश न्यायालयाने (Court) पोलीस अधिक्षकांना (SP) दिले आहेत. अशी माहिती सरकारी वकिल अर्जुन पवार यांनी दिली.

कर्जत (Karjat) तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे (Sub-Inspector Amarjit More) हे करत होते. ज्या मुलाने मुलीला पळवून नेले होते त्याने तीला पुन्हा आणून सोडले. यावेळी सदर मुलीचा जबाब पोलिसांनी नोंदविला. माझ्यावर अत्याचार झाला असून त्यातून मला गर्भधारणा (Pregnancy) झाली होते.

माझा गर्भपात केला (Abortion) असल्याचा जबाब पीडित मुलीने दिला. पोलिसांनी आरोपी मुलावर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. दरम्यान आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. जामीन अर्जाच्या चौकशी (Investigation) दरम्यान तपासातील गंभीर बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आल्या. योग्य कार्यवाहीसाठी आदेशाची प्रत पोलीस अधीक्षक यांना देण्याचे आदेश दिले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post