गावठी कट्टे विक्री करताना दोघांना पकडलेमाय वेब  टीम  

अहमदनगर - गावठी कट्टा विक्री करताना दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले आहे. अहमदनगर-जामखेड रस्त्यावरील टाकळी काझी शिवारातील बंद असलेल्या टोल नाक्याजवळ पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. संदीप पोपट गायकवाड (वय ४० रा. जांबूत ता. शिरुर जि. पुणे), भारत भगवा हतागळे (वय २५ रा. गोविंदवाडी तलवाडा ता. गेवराई जि. बीड) अशी पकडलेल्या दोघांची नावे आहेत.

या दोघांकडून दोन गावठी कट्टे, दोन जिवंत काडतूसे व दोन मोबाईल, असा एकूण ८० हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहाय्यक निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस कर्मचारी गणेश इंगळे, भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेेेठेकर, संदीप घोडके, शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, लक्ष्मण खोकले, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, राहुल सोळंके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post