अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोर मनसेने चिकटवले पोस्टर, म्हणाले - 'बिग बी मनाचा मोठेपणा दाखवा'


माय वेब टीम

मुंबई - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या जूहू येथील प्रतिक्षा बंगल्यासमोर काही पोस्टर लागले आहेत. विशेष म्हणजे हे पोस्टर त्यांच्या एखाद्या चित्रपटाचे नसून राज ठाकरे यांच्या नवनिर्माण पक्षाकडून लावण्यात आले आहेत.

झाले असे की, बृहन्मुंबई महानगरपालिका जवळपास एका आठवड्यापासून अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील प्रतिक्षा बंगल्याची एक भिंत पाडण्याची तयारी करत आहे. अमिताभ बच्चन यांचा बंगला संत ज्ञानेश्वर मार्गावर आहे आणि बीएमसीला हा रस्ता रुंद करायचा आहे, यामुळे अमिताभ यांच्या बंगल्याची भिंत पाडावी लागणार आहे.यासाठी मनसेने अमिताभ बच्चन यांना उद्देशून 'बिग बी शो बिग हार्ट' म्हणजे बिग बी मनाचा मोठेपणा दाखवा या मथळ्याचे पोस्टर त्यांच्या घराच्या बाहेर लावले आहेत. बुधवारी रात्री हे पोस्टर लावण्यात आले आहेत. 'मोठे महानायक आपला मोठेपणा दाखवा. हिच प्रतिक्षा. संत ज्ञानेश्वर मार्गाचे रुंदीकरण करण्यास मुंबई महानगर पालिकेला आणि जनतेला सहकार्य करावे,' असे या पोस्टरमध्ये लिहिण्यात आले आहे. मनसे विभाग अध्यक्ष मनिष धुरी यांच्या नेतृत्वात हे पोस्टर लावण्यात आले आहेत.

काय आहे प्रकरण?
अमिताभ बच्चन यांच्या घरासमोर दररोज वाहतुक कोंडी होते. या कारणामुळे बीएमसीला अमिताभ यांच्या बंगल्याशेजारील रस्ता 60 फूट रुंद करायचा आहे, सध्या या रस्त्याची रुंदी 45 फूट आहे. यापूर्वी 2017 मध्ये बीएमसीने अमिताभ बच्चन यांना नोटीस पाठविली होती, परंतु बिग बींनी अद्याप या नोटीसला उत्तर दिलेले नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post