चित्रपटात गरोदर दिसण्यासाठी कृतीने वाढवले 15 किलो वजन, काही दिवसांनंतर आला होता जंक फूडचा कंटाळा


माय वेब टीम 

आपल्या आगामी 'मिमी’ चित्रपटात कृती सेनन एका हुशार सरोगेट मदरच्या भूमिकेत असते. मात्र ती एका विचित्र परिस्थितीत अडकते. कृतीने गरोदर महिलेच्या भूमिकेसाठी स्वत:ला जाड दाखवण्यासाठी स्पेशल इफेक्ट्सचा आधार घेतला नाही, तिने नैसर्गिकरिी्या वजन वाढवले आणि कमीही केले. यासाठी तिने कोणताच व्यायाम केला नाही तर सर्व खाल्ले जे तिला खायचे होते, जेणे करुन वजन वाढण्यात मदत होऊ शकेल.

काही दिवसांनंतर जंक फूडचा कंटाळा आला होता
याविषयी कृती म्हणाली, 'चित्रपटाचे शेड्यूल दोन भागात विभागले आहेत, पहिल्या भागात मी सामान्य होते तर दुसऱ्या भागात मला गरोदर दिसायचे होते. माझी पचनक्रिया खूप चांगली आहे. त्यामुळे मी कोणत्याही प्रकारचे अन्न खाऊ शकते. त्यामुळे मला वजन वाढवणे सोपे गेले. त्यामुळे मी सकाळपासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत तळलेले आणि साखरेचे पदार्थ खात होते. मी दर दोन तासाला काही ना काही खात होते. काही दिवसांनंतर तर मला इतक्या मोठ्या प्रमाणात झंक फूड खाल्ल्यामुळे राग येऊ लागला. मला यावेळी योगाबरोबरच इतर कोणताही व्यायाम करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे स्वत:ला अनफिट वाटू लागले होते.'

ती खरंच गरोदर वाटत होती : लक्ष्मण उत्तेकर
दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर याविषयी सांगतात, लोकांशी कनेक्ट व्हायचं असेल तर तुला खरोखर गरोदर दिसायला लागेल, मी एवढेच कृतीला म्हणालो होतो. त्यानंतर कृतीने या भूमिकेसाठी इतकी मेहनत घेतली की, ती खरोखरच गरोदर असल्याचे आम्हाला वाटलं. ती आपल्या पात्रांमध्ये पूर्णपणे मग्न झाली आहे. हा चित्रपट ट्रेलरमध्येही स्पष्ट दिसून येतो. खूपच कमी अभिनेते आपल्या कलेला स्टारडमपेक्षावर ठेवतात. या भूमिकेतसाठी खूप मेहनत घ्यावी लागेल, याविषयी कृतीला आधीच कळाले असावे. चित्रपट पाहताना कृतीची मेहनत आणि समर्पण दिसून येईल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post