श्रीरामपूरच्या सराफाने केली मुंबईच्या व्यापार्‍याची दोन कोटीची फसवणूक

 माय वेब टीम 

श्रीरामपूर - सुवर्णालंकार व डायमंड अलंकाराच्या (Gold ornaments and diamond ornaments) व्यवहारापोटी श्रीरामपूर (Shrirampur Saraf) येथील सराफ पिता-पुत्राने मुंबई (Mumbai) येथील व्यापार्‍याची सुमारे दोन कोटी रुपयांची फसवणूक (Fraud of about two crore rupees to the trader) केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात 9Shrirampur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर शहरातील वैष्णवी अलंकार (Shrirampur Vaishnavi ornaments) गृह नंबर 2 येथील अक्षय बाळासाहेब डहाळे व बाळासाहेब विश्वनाथ डहाळे यांनी मुंबई येथील व्यापारी दिनेश प्रकाश मेहता (Dinesh Mehata) (वय 47, रा. विलेपार्ले, मुंबई) यांच्याकडून सुमारे 1 कोटी 98 लाख 6 हजार रुपयांचे सुवर्णालंकार व डायमंड अलंकाराचा व्यवहार केला होता.

या अलंकाराची रक्कम दिनेश मेहता यांनी अक्षय डहाळे व बाळासाहेब डहाळे यांच्याकडे मागितली असता त्यांनी दिली नाही. उलट मेहता यांना रक्कम व अलंकार परत न करता उलट तुला जे करायचे ते कर, तुझे सोने व डायमंडचे अलंकार आम्ही देणार नाही व पैसेही देणार नाही, असे बोलून मेहता यांची रक्कम बुडवण्याच्या हेतूने मेहता यांचे सुवर्णालंकार संगनमत करून, विश्वास संपादन करून, हडपण्यासाठी फसवणूक केली.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात प्रकाश मेहता यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजिस्ट नंबर 430/2021 प्रमाणे अक्षय बाळासाहेब डहाळे व बाळासाहेब विश्वनाथ डहाळे यांचे विरुध्द भादंवि कलम 420, 406, 34 अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल (Filed a fraud case) करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय सानप (Pi Sanjay Sanap) करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post