पवार कुटुंबाचा अनेक साखर कारखान्यांत घोटाळा, रोहित पवारांचीही चौकशी करा

 माय वेब टीम 

मुंबई - महाराष्ट्र राज्य सहकार बँक घोटाळा प्रकरणात ईडीने उपमुख्यमंत्री अजित पवारांचे (Deputy CM Ajit Pawar) मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या सातार्‍यातील जरंडेश्‍वर कारखान्यावर (Jarandeshwar Sugar Mills) जप्तीची कारवाई केली आहे. या कारवाईच्या पार्श्‍वभूमीवर भाजपाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्यावरही धक्कादायक आरोप केले आहेत. पवार कुटुंबियांनी अनेक साखर कारखान्यांच्या व्यवहारांमध्ये घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. Maharashtra State Co-operative Bank (MSCB) scam

रोहित पवार यांनी कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदी करण्याच्या व्यवहारामध्ये घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. या कारखान्याच्या विक्रीदरम्यान किंमत कमी करत रोहित पवारांनी घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. राज्य सहकारी बँकेत पवार कुटुंबाने घोटाळा केल्याचंही सोमय्या म्हणालेत. शिखर बँकेत घोटाळा करुन पवार कुटुंबाने अनेक कारखाने लाटल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.

रोहित पवार यांनी कन्नड सहकारी साखर कारखाना ज्या पद्धतीने राज्य सरकारी बँकेच्या लिलावामध्ये मॅन्युप्युलेशन करुन गडबड करुन 50 कोटी रुपयांना विकत घेतला. बारामती अ‍ॅग्रो साखर कारखाना त्यांनी विकत घेतला. याचा पण तपास व्हायला हवा. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा यामध्ये मोठा तोटा झाला आहे. हा व्यवहार म्हणजे पवार कुटुंबाचा मोठा घोटाळा आहे. या व्यवहारांची चौकशी व्हायला हवी असेही सोमय्या म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post