अकोले तालुक्यातील प्रतिष्ठित ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात

 माय वेब टीम

अकोले - अकोले तालुक्यातील एका प्रतिष्ठित व्यक्तीला ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात ओढून शरीर संबंधाचा अश्‍लील व्हिडिओ बनविला. आणि बदनामीची धमकी देत त्याच्याकडून दोन लाखाची खंडणी मागितल्याच्या प्रकार समोर आला आहे. या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकलेल्या प्रतिष्ठिताने धाडसाने पुढे येत अकोले पोलिसांत तक्रार दिल्याने या महिलेचे बिंग फुटले. या गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणाची तालुक्यात चांगलीच चर्चा सध्या सुरु आहे.

अकोले पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार गुन्ह्यातील आरोपी महिला व तिचा सहकारी यांनी दि. 11 जून 2021 ते दि.13जून 2021 रोजी तीन वाजता आरोपी महिला व तिच्या साथीदारांनी कटकारस्थान व संगनमत करुन या प्रतिष्ठित व्यक्तीला शरीरसंबधाचे अमिष दाखवून त्यांचेतील महिलेसोबत शरीरसंबध ठेवणेस भाग पाडले. त्याचा अश्‍लील व्हिडीओ बनवुन तो व्हायरल करण्याची धमकी देत दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. या व्यक्तीने आरोपी यांना पैसे न दिल्याने आरोपींनी या व्यक्तीला मारहाण करुन व्हिडीओ क्लीप व्हायरल करण्याची धमकी दिली. या व्यक्तीच्या ए.टी.एम मशीन मधून 30,000 रुपये बळजबरीने काढायला लावुन पैसे काढल्या नंतर ते बळजबरीने तक्रारदार यांचे कडुन घेवून अजुन 1,70,000 रुपयांची मागणी केली.

अकोले पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा.पो निरीक्षक मिथुन घुगे यांनी लागलीच सदर घटनेबाबत वरिष्ठांंना कळविले. तक्रारदाराकडे 10 हजार रुपये देऊन सुगाव फाटा येथे जावुन थांबण्यास सांगीतले व तेथे पोलिसांनी पंचासमक्ष सापळा लावुन एक महिला व एक पुरुष आरोपी यांना तक्रारदार यांचेकडुन 10 हजार रुपये खंडणी घेताना रंगेहाथ पकडले.

या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुरनं 253/2021, भा,द,वि कलम 120(ब) ,394, 384, 385, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपी ममहिलेस अटक करून काल बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठड़ी सुनावण्यात आली. त्यातील महिला आरोपी हीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. गुन्ह्यातील उर्वरीत आरोपीचा शोध सुरु आहे.

पोलीस अधिक्षक मनोज पाटील व अपर पोलीस अधिक्षक दिपाली काळे,. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मिथुन घुगे तसेच अकोले पोलीस ठाण्याचे पो. स.ई.डी व्ही साबळे, पो. ना. बडे,पो. ना. आहेर, पो.ना. कोरडे, पो.काँ आनंद मैड,पो.कॉ .शेरमाळे, पो.कॉ. संदिप भोसले, म.पो.कॉ. आहेर, म.पो.कॉ. थिटमे, म.पो.कॉ. पानसरे यांनी ही कारवाई केली. पुढील तपास.पो.नि. मिथुन घुगे हे करत आहेत.

नागरिकांनी कोणतीही भिती न बाळगता अश्या प्रकारे शरीर संबधाचे आमिष दाखवुन अश्‍लिल व्हिडीओ बनवुन त्याची धमकी देवुन लुट झाल्यास अथवा पैशाची मागणी केली असल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post