संजय राऊतांनी दिली माहिती ; ठाकरे भेटीत काय चर्चा झाली?माय नगर वेब टीम 

मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेटली घेतली. सोमवारी रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये चर्चा पार पडली. रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरु होती अशी माहिती एकनात शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान यावेळी बैठकीत नेमकी काय चर्चा झाली यासंबंधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांसी बोलत होते.

“शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली आहे. मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना भेटणार आहेत त्यासंबंधी यावेळी चर्चा झाली,” असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळ मागताच पंतप्रधानांनी तात्काळ दिली असून या बैठकीत तोडगा निघेल असा विश्वास व्यक्त केला आहे.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post