मोदींवर टीका केल्यानंतर चिदंबरम यांनी केला खुलासा : हो, मी चुकलो!


माय नगर वेब टीम 

नवी दिल्ली  - मोदी सरकारच्या लसीकरणाच्या धोरणावर विरोधक सातत्याने टीका करत आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही केंद्र सरकारला फटकारत लस धोरण सादर करण्यास सांगितलं होतं. दरम्यान, मोदी सरकारने काल (७ जून) १८ वर्षांपुढील सर्वांचं केंद्र सरकार मोफत लसीकरण करणार असल्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनंतर काही प्रश्न उपस्थित करत चिदंबरम यांनी सरकारवर टीकास्त्र डागलं होतं. सरकारवर टीका करताना झालेल्या चुकीबद्दल आता चिदंबरम यांनीच खुलासा केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (७ जून) लसीकरणासंदर्भात मोठी घोषणा केली. १८ वर्षांपुढील सर्व नागरिकांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकार घेणार आहे. २१ जूनपासून केंद्र सरकार लस उत्पादक कंपन्यांकडून लसीची खरेदी करून राज्यांना पुरवेल. त्यामुळे राज्यांना लसीसाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही. काही राज्यांनी लस खरेदीसाठी परवानगी मागितली होती. त्यामुळे राज्यांना परवानगी देण्यात आली होती, असंही पंतप्रधान म्हणाले होते.

पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेनंतर काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. मात्र, टीका करताना चिदंबरम यांनी मोदी सरकारने खोटा आरोप केल्याचा म्हटलं होतं. पंतप्रधान मोदी आता राज्य सरकारांना दोष देत आहेत. केंद्र सरकारने लस खरेदी करु नये, असं कुणीही म्हटलेलं नाही,” असं म्हणत चिदंबरम यांनी मोदींना लक्ष्य केलं होतं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post