मुलांमध्ये स्क्रीन एक्सपोजर वाढत आहे, हा धोका कमी करा

 


माय वेब टीम 

हेल्थ डेस्क - रिसर्च गेटच्या एका संशोधनानुसार, वयाच्या आठ वर्षांपर्यंतची मुले पाच तास मोबाइलवर असतात. हा वाढलेला स्क्रीन टाइम अनेक गंभीर आजारांचे कारण होऊ शकतो.

गॅजेटचा प्रकाश किती धोकादायक आहे? स्क्रीन एक्सपोजरशी संबंधित 6 मोठे धोके
१) रेटिनाला धोका

वेगवेगळ्या संशोधनांत असे आढळले की, जास्त वेळ स्मार्टफोन वापरल्याने त्याच्या निळ्या प्रकाशाने रेटिनाचे नुकसान होऊन दृष्टीवर परिणाम होतो.

२) कॅन्सर :
रात्री निळ्या प्रकाशाचे एक्सपोजर आणि झोपमोड होण्याचा संबंध सापडला आहे. यामुळे स्तन आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढला आहे.

३) लठ्ठपणा :
निळा प्रकाश मेलाटोनिन, झोप, भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोनवर परिणाम करतो. त्यामुळे लठ्ठपणा वाढण्याचा धोका आहे.

४) औदासीन्य :
निळ्या प्रकाशाने ज्यांच्या मेलाटोनिनवर परिणाम झाला आहे, शरीरचक्र बिघडले आहे त्यांच्यात जास्त औदासीन्य येते.

५) न्यूरोटॉक्सिन
दीर्घकाळ झोपवर परिणाम झाल्यामुळे शरीरात न्यूरोटॉक्सिनची निर्मिती होऊ लागते. त्यामुळे चांगल्या झोपेची शक्यता आणखी कमी होऊ लागते.

६) स्मरणशक्ती
झोपेवर परिणाम झाल्यामुळे सहजपणे लक्ष विचलित होते. स्मरणशक्तीवर परिणाम होतो.

डोळ्यांशी निगडित ३ वाईट सवयी
स्क्रीन खूप जवळ असणे
इलेक्ट्रॉनिक गॅजेट खूप जवळून पाहिल्यामुळे निळा प्रकाश डोळ्यांच्या मॅक्युलरचे नुकसान करतो. पापण्या मिटणे कमी होते. डोळ्यांत कोरडेपणा, वेदना आणि थकवा वाढतो.
- न्यूयाॅर्कच्या सनी कॉलेज ऑफ ऑप्टोमेट्रीनुसार गॅजेट ४० सेमी दूर ठेवून त्याचा फाँट मोठा ठेवा.

तणाव डोळ्यांसाठी धोकादायक
स्ट्रेस हार्मोन काॅर्टिसोल रेटिनाच्या कार्यप्रणालीवर परिणाम करतो. सेंटर सीरियस कोरियो रेटिनापॅथीचा धोका वाढतो. अस्पष्ट दिसते.
- ब्रिटनमध्ये झालेल्या संशोधनानुसार, एक तासाच्या म्युझिक कॉर्टिसोलमुळे हार्मोनमध्ये २५ टक्के घट

हिरव्या भाज्या कमी खाणे
हिरव्या भाज्यांमध्ये लुटीनसारखे न्यूट्रियंट्स असतात. त्या मॅक्युलर डिजनरेशनपासून वाचवतात.
- एका संशोधनानुसार, एक कप पालक रोज खाल्ल्याने ग्लुकोमाचा धोका ३० टक्के कमी होतो.

स्रोत : नेचर ऑफ न्युरोसायन्स, हार्वर्ड हेल्थ पब्लिकेशन, अमेरिकन मैक्युलर डीजनरेशन फाउंडेशन, जामा न्युराेलॉजी इत्यादी.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post