आजपासून भारत-न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल


 

माय वेब टीम

स्पोर्ट्स डेस्क  - कसाेटीच्या इतिहासातील सर्वात माेठ्या अाणि चित्तथरारक लढतीला अाज शुक्रवारपासून इंग्लंडच्या राेझ बाऊल स्टेडियमवर सुरुवात हाेणार अाहे. भारत अाणि न्यूझीलंड हे दोन्ही बलाढ्य संघ आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये समाेरासमाेर असतील. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ही चॅम्पियनशिप जिंकण्याच्या इराद्याने मैदानावर उतरणार अाहे. अातापर्यंतच्या निराशाजनक खेळीतून सावरत आयसीसीच्या या इव्हेंटमध्ये चॅम्पियन हाेण्याचा भारतीय संघाचा मानस अाहे. 

मालिका विजयाने न्यूझीलंडचा अात्मविश्वास द्विगुणित
कसाेटी चॅम्पियनशिप फायनलसाठी न्यूझीलंड टीमने प्रचंड मेहनत घेतली अाहे. या टीमने याच्या तयारीसाठी अायाेजित कसाेटी मालिकाही जिंकली. न्यूझीलंडने यजमान इंग्लंड संघाविरुद्धची दाेन कसाेटी सामन्यांची मालिका १-० ने जिंकली. या मालिका विजयातून न्यूझीलंडच्या खेळाडूंचा अात्मविश्वास द्विगुणित झाला अाहे. लक्षवेधी खेळीतून डेवाॅनने अापले सलामीचे स्थान निश्चित केले. तसेच मधल्या फळीत विल्यम्सन व टेलरसारखे अनुभवी फलंदाज सज्ज झालेले अाहेत. यष्टिरक्षक वाॅल्टटिंगची ही शेवटची कसाेटी अाहे.

मात्र, यासाठीची टीम इंडियाची वाट अधिक खडतर मानली जाते. कारण, अातापर्यंत टीमला आयसीसीच्या इव्हेंटमध्ये यशस्वी अशी लक्षवेधी कामगिरी करता अाली नाही. टीम इंडियाचा अशा इव्हेंटमध्ये फ्लॉप शाे ठरला अाहे. दुसरीकडे यजमान इंग्लंड संघाविरुद्ध कसाेटी मालिका विजयाने न्यूझीलंड टीम फाॅर्मात अाहे. अाता हीच लय कायम ठेवताना चॅम्पियनशिप जिंकण्याचा टीमचा मानस अाहे. अातापर्यंतच्या कामगिरीनुसार या ठिकाणी न्यूझीलंड संघ वरचढ ठरलेला अाहे.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post