माय वेब टीम
लॉकडाउन लागल्यापासून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या बुढाना गावात आहेत. त्याचे हे गाव उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात आहे. तिथे परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली झाली आहे, पण नवाजला सध्या तरी कामावर परत जाण्याची इच्छा नाही.
नवाजने पुढे सांगितले, 'एप्रिल 2020 ते 2021 या काळात मी दोन चित्रपट पूर्ण केले. यात ‘संगीन’ आणि ‘जोगिरा सा रा रा’चा समावेश आहे. माझा भाऊ शमसच्या ‘बोले चूडियां’ चित्रपटासाठी मी काही भाग शूट केले आहेत, एक म्युझिक व्हिडिओ शूट केला आहे आणि ‘बोले चूडियां’ साठी एक गाणे गायले आहे. याव्यतिरिक्त 7 जाहिराती शूट करण्यात आल्या. वर्षभरात बरेच काम आहे. मी यावर्षी कामावर गेलो नाही, तरीही माझ्यासाठी सर्व काही ठीक आहे.
Done for the day !!! pic.twitter.com/1oXDUS4E8m
— Nawazuddin Siddiqui (@Nawazuddin_S) June 22, 2020
याविषयी नवाज म्हणाला, ‘मुंबईत लॉकडाउन लागल्यानंतर आराम करण्यासाठी आलो होतो. पण आता शूटिंग पुन्हा सुरू झाले आहे. ही चांगली बातमी आहे, परंतु परत येण्याची ही योग्य वेळ नाही, असे मला वाटते. मी येथे बरीचशी काम करत आहे. मी माझी शेती करतो आणि भाजीपाला पिकवतो आहे. अशा गोष्टी मी मुंबईत करू शकत नाही. मी गेल्या काही वर्षांत खूप काम केले आहे. मी पुढे बरेच काम करणार आहे. पण जोपर्यंत मला सुरक्षित वाटत नाही, तोपर्यंत मी शूटिंगवर परत येणार नाही, असे मला वाटते.'
Post a Comment