पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या एक तासांहून अधिक वेळ बैठकमाय वेब टीम

मुंबई -मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री दिल्लीत पोहोचले आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधानांची भेट घेतील. यावेळी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हे त्यांच्यासोबत असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंमधील बैठकीला सुरुवात झाली असून एक तासाहून अधिक वेळ बैठक सुरु आहे.  

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पंतप्रधान मोदींची पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेट घेत आहेत. त्यामुळे आता या भेटीत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक होईल. कोरोनाशी सामना करत असताना राज्य सरकारला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळोवेळी पत्र लिहून अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या. पण आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे. त्यामुळेही या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.

महाराष्ट्राचा जीएसटी परतावा मिळावा, अजित पवारांचं पंतप्रधानांना निवेदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी 24 हजार 500 कोटींचा जीएसटीचा परतावा द्यावा, असं निवदेन दिल्याची माहिती आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post