विनयभंगप्रकरणी अभिनेता विजय राजला अटक

 


माय अहमदनगर वेब टीम

गोंदिया - अभिनेता विजय राज याला महिला सहकारी सदस्याचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. विजय राज याला या प्रकरणाबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. विजय राज याला गोंदीया येथून अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गोंदियाचे अतिरिक्त एसपी अतुल कुलकर्णी यांनी दिली. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विजय राज आपल्या टीम बरोबर बालाघाट येथे शेरनी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आले होते. यावेळी विजयराज यांनी कथितरित्या एका महीलेची छेड काढली. बॉलिवूड अभिनेता विजय राज याने रन, धमाल, वेलकम, मॉन्सून वेडिंग या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post