नागराज मंजुळे यांच्या नव्या लघुपटाचा टीझर पाहिला का?

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - 'सैराट', 'फँड्री', 'हायवे', 'नाळ' या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे लवकरच पुन्हा एकदा चाहत्याच्या भेटीस येत आहेत. नागराज मंजुळे यांचा आगामी 'तार' हा एक नवा चित्रपट येत आहे. यात एका नव्या भूमिकेत नागराज मंजुळे दिसणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे हे मराठी सिनेसृष्टीतील एक नामांकित दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. तर सध्या नागराज यांनी आपली स्वत:ची भूमिका असणारा 'तार' हा चित्रपट (लघुपट) लवकरच घेवून येत आहेत. या चित्रपटात नागराज मंजुळे यांनी लोकांची पत्रे पोहोचवणाऱ्या एका पोस्टमनची भूमिका साकारली आहे. 'तार' या चित्रपटाचा नुकतेच पहिले पोस्टर आणि टीझर रिलीज झाला आहे. 

या टिझरमध्ये नागराज यांनी डोंगराळ भागातील ओढे आणि नाल्याच्या पाण्यातून वाट काढत पत्रे पाहचविण्याचे काम केले आहे. गावातील लोकांना पत्रे पोहोचविल्यानंतर त्यात काही वेळा एखाद्याच्या निधनाची बातमी असायची. हे समजल्यावर यावेळी लोक खूपच रडायचे. हे पाहून मला ही कधी-कधी दु;ख व्हायचे. यावेळी मला असे वाटायचे की, या गावातील लोकांसाठी मी यमदूत आहे की काय?. ग्रामीण भागातील त्या काळची परिस्थिती या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.   

यानंतर 'तार' या लघुपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. यानंतर चाहत्यांकडून या चित्रपट पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  

या लघुपटाचे दिग्दर्शन पंकज सोनावणे करणार आहेत. नागराज मंजुळे यांच्याशिवाय या लघुपटात भूषण मंजुळे, भूषण हंबे, विवेक जांबळे, पूजा डोळस या कलाकारांनीही काम केले आहे. यातील विशेष म्हणजे, या कलाकारांसोबत नागराज मंजुळे यांनी 'सैराट' आणि 'फँड्री' या चित्रपटांची निर्मिती केली होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post