राज्याच्या जमिनीवर केंद्र सरकार हक्क सांगत आहे : सुप्रिया सुळे

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - मुंबईतील कांजूरमार्गमधील मेट्रो ३ आणि मेट्रो ६ साठीच्या कारशेडची जागेवरुन चांगलेच राजकारण पेटले आहे. आता केंद्राकडून कांजूरमार्गाच्या जागेवर हक्क दाखवला जात आहे. ही जागा मिठागराची असल्याने ही जागा केंद्राच्या अखत्यारीत आहे, असं केंद्राकडून सांगण्यात आलं आहे. केंद्राच्या उद्योग संवर्धन आणि व्यापार विभागाने या जमिनीवर आपला हक्क दाखवला आहे. तसे पत्र केंद्राकडून मुख्य सचिवांनी पाठवले आहे. यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. 


 राज्यांचे सगळे अधिकार काढून घेण्याचे पाप सातत्यानं सुरू असून केंद्र सरकार हळूहळू आणीबाणी आणू पाहत आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. कांजूरमार्गची जमीन महाराष्ट्र शासनाची आहे. त्या जमीनीवर केंद्र सरकार हक्क दाखवू शकत नाही. केंद्र सरकार राज्यांचे हक्क काढून घेत आहे. भाजपचे नेते कोणत्या आधारावर आमच्यावर टीका करत आहेत. भाजपच्या नेत्यांना  सत्ता नसल्यामुळे काही सुचत नाही. कदाचित त्यांचा समतोल बिघडला असावा. अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे. 


काय आहे प्रकरण 


मुंबईतील मेट्रो कारशेडसाठी आरे येथील जागेला नागरिकांनी विरोध केला होता. या जागेला पर्यायी जागा राज्य सरकारने कांजूरमार्ग येथे दिली. पर्यावरणाचं कारण देत आरेतील कारशेड कांजूरमार्गला हलवण्यात आले असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. 


आरेतील जागेवरुन पर्यावरण प्रेमींनी मोठे आंदोलन छेडले होते. याला कांजूरमार्ग ही पर्यायी जागा दिली आहे. या जागेवर केंद्राने हक्क दाखवला आहे. त्यामुळे राज्यात राजकारण पेटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post