आज भाग्य तुम्हाला किती साथ देईल?
माय अहमदनगर वेब टीम

 बुधवार, २५ नोव्हेंबर २०२०. चंद्र संपूर्ण दिवस मीन राशीत विराजमान असेल. चंद्र आणि मंगल ग्रहांच्या योगामुळे धनलाभाचे योग जुळून येत आहेत. बहुतांश राशीच्या व्यक्तींना सुख आणि आनंदाची प्राप्ती होऊ शकेल. तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस? कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय लाभ मिळू शकेल? जाणून घेऊया...

आजचे मराठी पंचांग : बुधवार, २५ नोव्हेंबर २०२०

मेष : एकीकडे खर्च होत असतानासुद्धा गुंतवणुकीकडे पाठ फिरवू नका. व्यापारी वर्गासाठी प्रगतीकारक ठरू शकेल. वैवाहिक जीवन आनंददायी ठरेल. विद्यार्थी वर्गाचा ताण काहीसा हलका होऊ शकेल. दिवसाचा उत्तरार्ध उत्तम ठरू शकेल. एखादी महत्त्वाची माहिती हाती लागू शकेल.

वृषभ : लोकांमध्ये अधिकाराच्या संधी चालून येतील. कलेमध्ये चुणूक दाखवाल. ग्रहांच्या अनुकूलतेमुळे आजचा दिवस विशेष ठरू शकेल. बहुप्रतिक्षित गोष्टींमध्ये शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतील. मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभेल. आर्थिक व्यवहारासंदर्भात कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : व्यवसायातील थकलेल्या गोष्टींना वेग येईल. विद्यार्थ्यांना चांगला काळ. आजचा दिवस उत्तम ठरू शकेल. भाग्याची भक्कम साथ लाभेल. शुभता आणि संपन्नता प्राप्त होऊ शकेल. खर्चात केलेली कपात हितकारक ठरेल. वेळेचा योग्य सदुपयोग करावा. जमिनीचे व्यवहार करताना सर्व बाबी तपासून घ्या.

कर्क : घरामध्ये चांगली चर्चा घडून येईल. लोकांमध्ये त्रागा करू नका. दिवसाच्या सुरुवातीला शुभवार्ता मिळू शकतील. अपेक्षित परिणाम प्राप्त झाल्याने मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल. मनोबल वाढेल. पराक्रम वृद्धिंगत होईल. परोपकार केल्याने समाधान लाभेल. दिवसाचा उत्तरार्ध उत्तम असेल. कौटुंबिक वातावरण आनंदी व उत्साही राहील.

सिंह : आपल्या कर्तृत्वावर कार्यसिद्धी कराल. जोडीदाराबरोबर गैरसमज निर्माण होऊ देऊ नका. भाग्याची भक्कम साथ लाभेल. मान, सन्मान मिळतील. नवीन संशोधनात आपली आवड वाढीस लागेल. धनलाभाचे योग जुळून येऊ शकतील. जुन्या मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल. हाती घेतलेले काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने आनंद होईल.

कन्या : बोलताना आपल्या मुद्यावर ठाम रहा. मुलांबरोबर उत्तम काळ घालवाल. एखाद्या गोष्टीची चिंता लागून राहील. जवळच्या व्यक्तीच्या आरोग्याची काळजी सतावेल. कामाचा बोजा वाढेल. केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करणे हिताचे ठरेल. घरातील वातावरण हलकेफुलके करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. समस्यांचे निराकरण होऊ शकेल.

तुळ : प्रतिस्पर्ध्यास उत्तम रीतीने ओळखा. अति तिखट पदार्थांचे सेवन टाळा. आजचा दिवस संमिश्र ठरू शकेल. घाईने कोणतेही निर्णय न घेणे हिताचे ठरेल. वैयक्तिक मतभेदांचा परिणाम व्यवसायावर होणार नाही, याची काळजी घ्यावी. जोडीदाराशी मतभेद संभवतात. मात्र, चर्चेने यावर उपाय निघू शकेल. संवाद वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहावे.

वृश्चिक : आपल्या आक्रमकपणाला थोडा आवर घाला.अभ्यासामध्ये आपले वर्चस्व राहील. आजचा दिवस आपल्यासाठी अनुकूल असेल. लोकप्रियतेत वाढ होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींशी झालेली नवीन ओळख भविष्यात फायदेशीर ठरू शकेल. विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

धनु : घरातील सर्व कामे मार्गी लागतील. नातेवाईक-मित्रांच्या गप्पा रंगतील. विरोधक पराभूत होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम दिवस. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. वैवाहिक जीवन सुखमय असेल. प्रवास करताना सावध राहावे.

मकर : आपल्या पराक्रमाने उजळून निघाल. जवळच्या माणसांशी सुसंवाद साधाल. मान, सन्मान प्राप्त होऊ शकेल. मित्रांकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता. रोजगार क्षेत्रातील प्रयत्न यशस्वी ठरतील. दिवसाच्या उत्तरार्धात घडलेले प्रवास लाभदायक ठरू शकतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.

कुंभ : अधिकाराचा गैरवापर करू नका. अचानक कोणताही निर्णय घेऊ नका. भाग्योदयाचे योग जुळून येऊ शकतील. मन प्रसन्न राहील. नियोजित कामे उत्तमरित्या पार पडल्याने आनंद होईल. कोषवृद्धीची शक्यता. कार्यशैली आणि मृदु व्यवहारामुळे लाभ मिळतील. दिवसाच्या उत्तरार्धात प्रवास संभवतात.

मीन : विनाकारण चिडचिड होणार नाही, याकडे लक्ष द्या. प्रतिस्पर्ध्याच्या चाली वेळीच ओळखा. आजचा दिवस शुभ ठरेल. शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतील. दिवसाच्या सुरुवातीपासून काहीशी धावपळ करावी लागेल. पालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शाबासकी मिळेल. जोडीदाराचे सहयोग व सानिध्य प्राप्त होऊ शकेल. दिवसाच्या उत्तरार्धात थकवा जाणवेल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post