विहंग यांना ५ तासांच्या चौकशीनंतर सोडले; प्रताप सरनाईक आणखी आक्रमकमाय अहमदनगर वेब टीम
मुंबई - मनी लाँड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी  ) आज शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे ठाणे येथील घर आणि कार्यालयांवर छापे टाकले होते. या कारवाईनंतर सरनाईक यांचे पुत्र विहंग यांना ताब्यात घेण्यात आले होते. ईडीच्या मुंबईतील कार्यालयात विहंग यांची ५ तास कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री ८ वाजता त्यांना कार्यालयातून जाण्यास परवानगी देण्यात आली

टॉप्स ग्रुप्स कंपनीच्या प्रवर्तकांच्या दहाहून अधिक ठिकाणांची झडती घेण्यात आली. बेहिशेबी मालमत्तेसाठी ही चौकशी करण्यात आली. यात काही नेत्यांची नावेही पुढे आली आहेत. त्याआधारे मुंबई आणि ठाण्यातील काही ठिकाणी ईडीने छापे टाकले असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यात प्रताप सरनाईक यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला. दुपारी सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षेत ही कारवाई करण्यात आली. कारवाईवेळी प्रताप सरनाईक आणि त्यांचे पुत्र पुर्वेश घरी नव्हते तर विहंग मात्र घरी होते. कारवाईनंतर ईडीच्या पथकाने चौकशीसाठी विहंग यांना ताब्यात घेतले. टॉप्स ग्रुपच्या प्रवर्तकांनी ( नंदा परिवार ) काही कंपन्या खरेदी केल्या होत्या. या कंपन्यांच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय ईडीला आहे. यातील एका कंपनीच्या संचालक मंडळात विहंग सरनाईक यांचा समावेश आहे. त्याआधारावरच त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. दुपारी ठाण्यातून त्यांना मुंबईतील ईडी कार्यालयात आणले गेले. तिथे सुमारे पाच तास त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास त्यांना घरी जाऊ देण्यात आले आहे.

मी गप्प बसणार नाही: सरनाईक
ईडीने छापा टाकला तेव्हा प्रताप सरनाईक घरी नव्हते. सायंकाळी ते मुंबईत माध्यमांना सामोरे गेले. यावेळी या संपूर्ण कारवाईवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ईडीच्या अशा कारवाईने मी गप्प बसणार नाही. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राची कुणी बदनामी करणार असेल तर मी यापुढेही बोलत राहणार आहे. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी मी फासावरही जायला तयार आहे, अशा शब्दांत सरनाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
दरम्यान, प्रताप सरनाईक हे ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. या मतदारसंघातून सलग तीनवेळा ते निवडून आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते सातत्याने भाजपला लक्ष्य करत आहेत. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध त्यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव आणला होता. याशिवाय अभिनेत्री कंगना राणावत विरुद्धही त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. या पार्श्वभूमीवर सरनाईक यांच्यावर ईडीमार्फत झालेल्या कारवाईने मोठे वादळ उठले आहे. शिवसेना सरनाईक यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या कारवाईवर तीव्र प्रतिक्रिया दिली आ

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post