ठाकरे सरकार किती काळ टिकणार?; फडणवीसांनी पुन्हा केले मोठे विधान



माय अहमदनगर वेब टीम

पंढरपूर: राज्यातील तीन पक्षांचे सरकार हे त्यांच्या वजनानेच पडणार आहे आणि त्यानंतर भाजप लगेचच स्वबळावर सत्ता स्थापन करणार आहे, असे विधान आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. नव्या सरकारसाठी कोणताही मुहूर्त ठरवलेला नसल्याचेही त्यांनी पुढे नमूद केले. 

पंढरपूर येथे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आले असता फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. असले सरकार चालत नसते, असे सांगताना आम्हाला कोणतीही घाई नाही. तुम्ही फक्त वाट बघा, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयांवर आज छापे टाकले. सरनाईक यांचे पुत्र विहंग यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. 'ईडी ही तपास यंत्रणा एका राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणे काम करत आहे. ज्यांच्या आदेशावर ईडी कारवाई करत आहे, त्या पक्षाच्या १०० लोकांची यादी मी त्यांच्याकडे पाठवून देतो. त्यांच्यावर कारवाई करून दाखवा,' असे आव्हानच संजय राऊत यांनी दिले आहे. त्यावर फडणवीस यांनी पलटवार केला.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post