आरोग्यमंत्री टोपे यांनी व्यक्त केली 'ही' मोठी भीती

 


माय अहमदनगर वेब टीम

दापोली - दिल्‍लीतील कोरोनाच्या लोटेपाठोपाठ महाराष्ट्रातही दुसरी लाट येऊ शकते. राज्यभरातील कोरोना रुग्णांची वाढती चिंताजनक संख्या लक्षात घेता कोरोनाची दुसरी लाट महागात पडून शकते, अशी भीती शुक्रवारी दापोली दौर्‍यावर आलेले सार्व. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्‍त केली. राज्यासाठी नुकतीच 500 रुग्णवाहिकांना मंजुरी घेण्यात आली असून, त्यापैकी 250 रुग्णवाहिका आठवडाभरात खरेदी केल्या जाणार आहेत. त्यापैकी 17  रुग्णवाहिका या दापोली तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यासाठी देणार असल्याचे ना. टोपे यांनी सांगितले.

ना. टोपे हे शुक्रवारी खासगी दौर्‍यानिमित्त दापोलीला आले असता उपजिल्हा रुग्णालय येथे पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.यावेळी आमदार योगेश कदम, माजी आमदार संजय कदम, जिल्हाधिकारी लक्ष्मीक्षनारायण मिश्रा, जिल्हा आरोग्य अधिकारी बबिता कमलापूरकर,  उपसभापती ममता शिंदे,  राष्ट्रवादी प्रवक्ते मुजीब रुमाणे, उन्हवरे विभाग अध्यक्ष अनंत पाटील, दापोली नगराध्यक्ष परवीन शेख आदी उपस्थित होते.

आरोग्य विभागात कोकणात रिक्त जागांचे प्रमाण अधिक असल्याने चक्राकार पद्धतीमध्ये कोकणाला  रिक्त जागा भरण्यासाठी प्राधान्य देण्याची गरज आहे. या बाबत मुख्यमंत्री यांना आपण सांगितले असून कोकणाला रिक्त जागा भरण्याचे धोरणात्मक गरजेचे आहे. अन्य विभागात रिक्त जागा भरणे शक्य नसले तरी आरोग्य विभागाला प्राधान्य द्यावे, असे मत मुख्यमंत्री यांच्याकडे मांडले असल्याचे ते म्हणाले.

दापोलीसाठी ठिकाणी रक्तपेढी आवश्यक आहे. त्यासाठी पाच तालुक्यांच्या मध्य भागाची निवड करण्यात येईल. यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून  जिल्हा नियोजनमधून मंजुरी घेण्यात आली आहे. त्यासाठी महराष्ट्र राज्य रक्त संक्रमण समिती यांची मंजुरी तत्काळ घेतली जाईल आणि ‘डीपीडीसी’तून यास निधी खर्च केला जाईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे, असे ना. टोपे यांनी सांगितले. खेड  तालुक्यातील कळंबणी येथे येथे ही रक्तपेढी सुरु केली जाईल, असे ते म्हिणाले. 

दापोली पर्यटन ठिकाणी जे अपघात होतात त्यासाठी टुरिझम या धर्तीवर येथे मोबाईल अँब्युलन्स आवश्यक आहे, असे ना. टोपे यांनी सांगितले.  दापोली येथील स्वामी समर्थ रुग्णालय येथे महिलांच्या प्रसुतीसाठी व्यवस्था करण्यात आली असून त्या प्रसुतीच्या खर्च हा महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून केली जाईल. तालुक्यतील अनेक गरजू लोकांना त्याचा फायदा होईल, असेही ना. टोप यावेळी म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post