काश्मीरची सून IAS टाॅपर टीना डबी घेणार घटस्फोट

 


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये २०१५ साली टॉपर असलेल्या टीना डबी आणि अतहर अमिर यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी १७ नोव्हेंबर रोजी जयपूरच्या फॅमिली कोर्टात दोघांच्या सहमतीने सोडचीट्टी घेण्याचा अर्ज दाखल केला आहे. लोकसेवा परिक्षेत टॉपर आलेल्या टीना आणि अतहर यांच्या लव स्टोरीची जोरदार चर्चा रंगली होती. त्या दोघांनी २०१८ साली धुमधडाक्यात लग्न केले होते.

दिल्लीत ११ मे २०१५ साली टीना डबी यांची मुलाखत झाली होती. यावेळी त्यांची पहिली भेट झाली होती, त्यावेळीपासून ते एकत्र आले. परंतु, काही काळानंतर त्यांच्या नात्यात कटुता आली. त्यांनी दाखल केलेल्या अर्जात आम्ही दोघेही सध्या एकत्र राहू शकत नाही. दरम्यान ते दोघेही जयपूरमध्ये कार्यरत आहेत. टीना डबी या अर्थ विभागात संयुक्त सचिव आहेत तर अमीर अहमद मुख्य कार्यकारी म्हणून कार्यरत आहेत.

२०१५ साली युपीएससी टॉपर टीना डबी यांनी जम्मू काश्मीरचे अतहर आमीर उल शफी खान यांच्यासोबत त्या विवाह बंधनात अडकल्या. दरम्यान अतहर यांनी २०१५ साली लोकसेवा परिक्षेत दुसरी रँक मिळवली होती. टीना डबी आणि अतहर आमिर यांच्या विवाहावेळी हिंदु महासभेकडून आक्षेप घेण्यात आला होता. याचबरोबर विविध हिंदु संघटनांकडून लव जिहाद असल्याचे सांगण्यात आले. अतहर हे अनंतनागचे राहणारे आहेत तर टीना डबी  दिल्लीस्थित आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post