धनंजय मुंडेंना सीएसएमटीवरील ‘त्या’ पेटीमुळे झाली गोपीनाथ मुंडेंची आठवण

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - भूतकाळातील आठवणीशी कधी भेट होईल सांगता येत नाही. अचानक काही घडतं आणि जुन्या घटनांचं स्मरण होतं. असाच एक किस्सा घडला राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर असलेल्या एका पेटीमुळे स्व. गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा मिळाला.

झालं असं की धनंजय मुंडे लातूरला निघाले होते. लातूरला जाण्यासाठी धनंजय मुंडे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आले. तिथे त्याची भेट रेल्वे स्थानकावरील हमालांशी झाली. यावेळी रेल्वे हमालांनी धनंजय मुंडे यांना गोपीनाथ मुंडे यांची आठवण सांगत ते नेहमी बसायचे त्या पेटीवर बसण्याची मागणी केली. धनंजय मुंडे यांनीही त्यांचा विनंती पूर्ण केली.

हा किस्सा स्वतः धनंजय मुंडे यांनी ट्विट करून शेअरही केला आहे. “स्व.मुंडे साहेब मुंबईच्या सीएसटी रेल्वे स्थानकावर ज्या पेटीवर बसायचे आज लातूरला प्रवासासाठी जात असताना स्थानकावरील हमाल मंडळींनी त्याच पेटीवर बसण्याचा आग्रह केला. मी पेटीवर बसलो. सर्व बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा देत सर्वांना माझ्या घरी जेवणाचे निमंत्रण दिले,” अशा भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर असलेल्या एका निर्जीव पेटीमुळे गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा मिळाला.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post