एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत शरद पवार यांचे मौन

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याबरोबर माझी बुधवारी भेट ठरली नव्हती. त्यामुळे त्यांच्याशी भेट होण्याचा प्रश्न नाही, असे स्पष्ट करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खडसे यांच्या राष्ट्रवादीतील संभाव्य प्रवेशावर बुधवारी मौन बाळगले आहे. 

एकनाथ खडसे हे बुधवारी शरद पवार यांना मुंबईत भेटणार आहेत. दोघांतील ही भेट खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशासंदर्भातली निर्णायक असल्याच्या मोठ्या चर्चा होत्या. यासंदर्भात पवार यांना यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकारांनी विचारले असता, 'आमच्या भेटीचे नियोजन नव्हते. त्यामुळे भेट घेण्याचा प्रश्न नाही. उद्या (गुरुवारी) मी दिल्लीत असणार आहे,' असे उत्तर पवार यांनी दिले.

दोन आठवड्यांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी व लोकप्रतिनिधींशी यासंदर्भात स्वत: शरद पवार यांनी मुंबईत चर्चा केली होती. खडसे यांना पक्षात प्रवेश दिल्यास जिल्ह्यात बदलणाऱ्या राजकीय समीकरणांचा त्यांनी अंदाज घेतला होता. मागच्या फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातून केवळ ११ महिन्यांत खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर खडसे यांचे पक्षाने पुनर्वसन केले नाही. परिणामी नाराज खडसे भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post