शाळांबाबतचा निर्णय दिवाळीनंतरच

 माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - केंद्र सरकारने १५ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास मुभा दिली असली तरी राज्यातील शाळा दिवाळीपर्यंत  बंदच राहणार आहेत. राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय दिवाळीनंतर घ्यावा, असे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी ठरविण्यात आले.

केंद्राने परवानगी दिली असली तरी महाराष्ट्रात शाळा सुरू करण्याची घाई करू नये, असाच सर्व मंत्र्यांचा सूर होता. काही देशांमध्ये शाळा व महाविद्यालये सुरू करण्यात आल्यावर विद्यार्थ्यांना करोनाचा संसर्ग झाला, याकडे काही मंत्र्यांनी लक्ष वेधले.

सध्या दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. अशा वेळी शाळा सुरू करण्याची घाई करू नये, असेच मत मंत्र्यांनी व्यक्त केले. यामुळे राज्यात करोनाचा प्रादुर्भाव किती आहे, याचा आढावा घेऊन २० नोव्हेंबरनंतरच शाळा सुरू करण्याबाबत विचार होईल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post