नगरमध्ये निवडणुकांचा धुरळा : शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी



माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे पुढे ढकललेल्या नगर तालुक्यातील ५७ ग्रामपंचायत व ५७ सेवा संस्थांच्या निवडणुकांचा बार आता कधीही उडु शकतो . शिवसेनेने सध्या गावागावात सभासद नोंदणी अभियान सुरू केले आहे तर भाजपने जिल्हा बँकेमार्फत देण्यात येणाऱ्या पशुपालनाचे चेक वितरण गावोगावी सुरू केले असुन दोन्ही पक्षांनी यातुन जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे .


नगर तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींची व ५७ सेवा संस्थाची मुदत सप्टेबरमध्येच संपल्याने प्रशासनाने त्या गावात सध्या प्रशासकाची नेमणूक केली आहे . आता राज्य सरकारने नगर पंचायतीच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे . यामुळे कोरोनामुळे रखडलेल्या नगर तालुक्यातील निम्म्याहुन अधिक गावांच्या निवडणुकांचा कार्यक्रम आता कधीही जाहिर होऊ शकतो .


आगामी नगर बाजार समिती , जिल्हा बँक व पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर नगर तालुक्यात होणाऱ्या ग्रामपंचायत व सेवा संस्थाच्या निवडणुकांना मोठे महत्त्व आले आहे .


याचीच तयारी म्हणुन शिवसेनेने गावोगावी सभासद नोंदणी अभियानाच्या माध्यमातुन कार्यकर्ते जुळवाजुळव सुरू केली आहे . शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा . शशिकांत गाडे , उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, सभापती प्रविण कोकाटे , राजेंद्र भगत , शरद झोडगे , गोविंद मोकाटे आदि नेते मंडळी गावोगावी मोर्चेबांधणी करीत आहेत .


तर भाजपच्या वतीने जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांना पशुपालनासाठी खेळते भांडवल योजनेतुन चेक वितरणाचे कार्यक्रम सुरू आहेत . माजी आमदार शिवाजी कर्डिले, बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे , उपसभापती संतोष म्हस्के , दिलीप भालसिंग , मनोज कोकाटे आदि नेते या कार्यक्रमांच्या निमित्ताने तयारी करीत आहेत .



या ग्रामपंचायतींच्या होणार निवडणुका  हमीदपूर,हिवरेबाजार, पिंपळगाव वाघ,चिचोंडी पाटील,टाकळी काझी,डोंगरगण,मांजरसुन्भा,दशमी गव्हाण,मांडवे,धनगरवाडी,गुंडेगाव,पोखर्डी,निमगाव वाघा,अकोळनेर,भोरवाडी,खारे कर्जुने,इमामपूर,घोसपुरी,बुर्हाणनगर,वडारवाडी,जेऊर,खंडाला,पारगावमौला,रतडगाव,देवगाव,वारूळवाडी,इसळक,निमगाव घाना,दरेवाडी,आंबीलवाडी,बारा बाभळी,वाटेफळ,हातवळण,मठपिंपरी,रुईछ्तीशी,खडकी,ससेवाडी,उदरमल,कामरगाव,चास,तांदळी,वडगाव,शिंगवे नाईक,सांडवे,निंबळक,नवनागापूर,वाकोडी,वाळूंज,घोसपुरी,माथनी,बालेवाडी,खांडके,शिराढोण,कोल्हेवाडी,गुणवडी या सर्व ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे.



निवडणुका होणाऱ्या सेवा संस्था

देऊळगाव सिद्धी, जेऊर,घोसपुरी,खारे कर्जुने,सारोळा कासार,वडगाव तांदळी,निंबळक,बाबुर्डी बेंद,निमगाव वाघा,आठवड,डोंगरगण,केडगाव,साकत,देवगाव,भोयरेपठार,कापूरवाडी,दरेवाडी,निंबोडी,पिंपळगाव वाघा,सोनेवाडी चास,मांडवे,सावेडी,माथनी,रतडगाव,मदडगाव,हिवरेबाजार,नागरदेवळे,दशमी गव्हाण,भिंगार,शहापूर केकती,अकोळनेर,मांजरसुन्बा ,कोल्हेवाडी,बहिरवाडी,पारगाव मौला,निमगाव वाघा,जांब,बुर्हाणनगर,बारदरी,धनगरवाडी,बोल्हेगाव,जाधववाडी,बाळेश्वर,मिनिनाथ,हनुमान,कौडगाव,इमामपूर,वाळकी,बाबुर्डी घुमट,गुणवडी,तांदळी,शेंडी,उक्कडगाव,टाकळीकाजी,पिंपळगाव माळवी.यातील जाधववाडी,भोयरेपठार,सोनेवाडी सावेडी,माथनी,नागरदेवळे,बाबुर्डी बेंद या सेवा संस्थाची मुदत संपली आहे.



" कोरोनाच्या संकट काळात शेतकऱ्याना जिल्हा बँक सोडली तर कुठलीही  बँक कर्ज देत नाही . अश्या परीस्थितीत शेतकऱ्यासाठी माजी आ .कर्डिले हे शेतकऱ्यांसाठी धावून आले .याचा नक्कीच येणाऱ्या सोसायटी, ग्रामपंचायत तसेच जिप व पचायत समिती च्या निवडणुकीत फायदा होणार आहे . सोसायटीत गावपातळीवर वाद असतात मात्र दोन्ही गट जवळ पास आमदाराचे असतात . कर्जवाटपाच्या माध्यमातून लोकापर्यत जाण्याचा हा चांगला योग आला आहे याचा नक्कीच फायदा होणार आहे . तशी हि येणाऱ्या निवडणुकीची पुर्व तयार म्हणायला काही हारकत नाही . "


- दिलीप भालसिंग ( जिल्हा सरचिटणीस भाजप )



 " शिवसेनेची सभासद नोंदणी दर दोन वर्षानी असते . याच्या माध्यमातून लोकापर्यत पोहचता येते . सेनेच्या ताब्यात सध्या जिल्हा परीषद पंचायत समिती आहेत . त्यातील योजना सर्वसामान्यपर्यत पोहचवता येत आहे . संघटना ही मजबूत होत आहे . लोकाना येणाऱ्या अडचणी या दौऱ्याच्या माध्यमातून सोडवता येत आहे. येणाऱ्या निवडणुकीत या नाव नोंदणीचा फायदा होणार आहे . "

- राजेंद्र भगत ( तालुकाप्रमुख , शिवसेना )

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post