माय अहमदनगर वेब टीम
गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२०. चंद्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. काही राशीच्या व्यक्तींना प्रगतीकारक दिवस असेल. तर काही राशीच्या व्यक्तींना भागीदारी आणि सहकार्यांकडून उत्तम लाभ मिळू शकतील. तुमच्यासाठी कसा असेल दिवस? कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय लाभ मिळेल? जाणून घेऊया...
आजचे मराठी पंचांग : गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२०
मेष : आपल्या हातून समाजसेवा घडेल. मानसिक अस्वस्थता जाणवून देऊ नका. राशी स्वामी चित्रा नक्षत्राच्या द्वितीय चरणावर आहे. नोकरदार वर्गाला दिलासादायक घटना घडतील. नोकरीत उच्च पद मिळण्याचे संकेत. काही घटना, प्रसंगांमुळे चीडचीड होऊ शकेल. मिळकत समाधानकारक राहील. मामाकडून लाभ मिळण्याची शक्यता. दिवसाचा उत्तरार्ध व्यस्त राहील.
वृषभ : कलाक्षेत्राच्या लोकांना जनमान्यता मिळेल. नोकरीमध्ये कामाचे कौतुक होईल. संपत्ती, सुख विस्तारेल. कौटुंबित वातावरण आनंदी व उत्साही राहील. ज्येष्ठ व्यक्तींकडून धनलाभाची शक्यता. नोकरीतील बदल फायदेशीर ठरू शकेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. दिवसाच्या उत्तरार्धात कला, संगीताचा आनंद घेऊ शकाल.
मिथुन : घरामध्ये वेगवेगळी कामे निघतील. जोडीदाराची अनपेक्षितरित्या मदत होईल. नोकरीत पदोन्नतीचे प्रबळ योग. मुलांकडून सुखदवार्ता मिळतील. जीवनस्तर उंचावणाऱ्या घटना घडू शकतील. नवीन वस्त्रे खरेदी करण्याकडे कल राहील. विरोधक पराभूत होतील. कुटुंबातील सदस्यांसोबत हास्य-विनोद करण्यात उत्तम काळ व्यतीत होईल. गरजूंना मदत केल्याचे समाधान प्राप्त होऊ शकेल.
कर्क : शोधात असलेले कार्य पूर्ण होईल. भागीदारीच्या कामात मोठा फायदा होईल. मुलांकडून शुभवार्ता मिळू शकतील. वस्त्रे भेटवस्तू म्हणून मिळण्याचे संकेत. मित्रांमुळे निराशा समाप्त होईल. सायंकाळी अध्ययन, पठण, पाठांतरात व्यतीत होऊ शकेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम दिवस ठरू शकेल.
सिंह : आपल्या बोलण्यातील आक्रमता कमी करा. समोरच्याची मने जिंकून घ्याल. मंगलकार्याच्या योजनावर चर्चा शक्य. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल. जवळच्या मित्रांची मदत मोलाची तसेच लाभदायक ठरू शकेल. मनोबल वाढीस लागेल. अपचन तसेच वाताचे त्रास संभवतात. आहारावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
कन्या : आपल्या कर्तृत्वावर कार्य सिद्धीस न्याल. आपले मुद्दे मांडताना गाफील राहू नका. कार्यक्षेत्रात कामाची व्यस्तता अधिक राहील. मिळकतीत यथोचित वाढ संभवते. बौद्धिक कार्ये, लेखन यांतून लाभ मिळतील. रागावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. मुलांकडून उच्च शिक्षण, संशोधन आदीत सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतील. काही जुने मतभेद मिटू शकतील.
तुळ : बरेच दिवस राहून गेलला प्रवास करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब कराल. मनाविरुद्ध एखादे कार्य करावे लागू शकेल. कौटुंबिक वातावरण आनंदी व सकारात्मक राहील. अचानक खर्चात वाढ होऊ शकेल. कार्यालयात अधिकारी वर्गाकडून संपूर्ण सहकार्य लाभेल. दिवसाच्या उत्तरार्धात धार्मिक साहित्याचे वाचन होऊ शकेल.
वृश्चिक : गोष्टी मनाप्रमाणे घडतील. जुनी उधारी वसूल होईल. पालकांचे सानिध्य आणि शुभाशिर्वाद लाभतील. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे मार्गी लागतील. ज्येष्ठ आणि तज्ज्ञ व्यक्तीचे सहकार्य मोलाचे ठरू शकेल. मुलांना बौद्धिक क्षेत्रात सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतील.
धनु : दूरच्या नातेवाईकांशी बऱ्याच गप्पा होतील. व्यवसायामध्ये मोठी हालचाल दिसून येईल. कार्यक्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागेल. अधिक परिश्रम घ्यावे लागतील. बोलताना तारतम्य ठेवावे. कुटुंबातील सदस्यांशी वैचारिक मतभेद संभवतात. दिवसाच्या उत्तरार्धात छोटे प्रवास घडू शकतील. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
मकर : आपला पराक्रम लोकांच्या दृष्टीस पडेल. घरामध्ये अनावश्यक खर्च काढाल. मान, सन्मान, प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. हितशत्रू आणि विरोधक नामोहरम होतील. भाग्योदयाच्या प्रबळ योगाचे संकेत. कीर्ती वाढेल. हाती घेतलेल्या कामात उत्तम यश मिळेल. प्रगती साध्य करू शकाल. मनोकामना पूर्ण होऊ शकतील. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभू शकेल.
कुंभ : अचानकपणे काही संधी चालून येतील. मित्रांमध्ये चांगल्या चर्चेत राहाल. कार्यक्षेत्रात अतिरिक्त जबाबदारी वाढेल. धार्मिक कार्यातील रुची वाढेल. संपत्ती विस्तारण्याचे संकेत. रागावर नियंत्रण ठेवावे. जोडीदाराशी वैचारिक मतभेद होऊ शकतील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.
मीन : नोकरीमध्ये मोठ्या लोकांकडून स्तुती होईल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. धर्म-कर्मात आस्था वाढेल. डागडुजीवर खर्च होऊ शकतील. जवळच्या मित्रांशी वा
Post a Comment