वारंवार दंडवत घालूनही डोनाल्ड ट्रम्प यांची जाहीर चर्चेत भारतावर जीभ घसरली!



माय अहमदनगर वेब टीम

वॉशिंग्टन - अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीसाठी रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. अत्यंत खालच्या पातळीला जाऊन अमेरिकेत प्रचार सुरु आहे. यामध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर आहेत. डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन आणि ट्रम्प यांच्यातील जाहीर चर्चेची शेवटची फेरी आज पार पडली. 

भारतावर सातत्याने कौतुकाचा वर्षाव करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी हवामान बदलावरून टीका केली. ट्रम्प यांनी हवामान बदलावर भारत, चीन, रशियावर टीकास्त्र सोडले. ट्रम्प यांनी हवामान बदलावर केल्या जाणाऱ्या भारताच्या कामावरही ताशेरे ओढले. हवामान बदलाविरोधात भारत, चीन आणि रशिया योग्य काम करत नसल्याचे ते म्हणाले. 

ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेत गेल्या ३५ वर्षात सर्वात कमी कार्बन उत्सर्जन झाला आहे. आपली हवा स्वच्छ आहे. पाणी सर्वात स्वच्छ आहे आणि कार्बन उत्सर्जन सर्वात कमी आहे. चीनकडे पहा. किती घाणेरडी हवा आहे. रशियाकडे पहा किती घाण आहे. भारताकडे पहा किती घाणेरडी हवा आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post