मुंबई इंडियन्सचे अधिकृत ट्विट 'आता कसं वाटतय?' माय अहमदनगर वेब टीम

दुबई  - आयपीएलच्या १३ व्या हंगामातील आज मुंबई इंडियन्स विरुध्द चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज फलंदाजी करत आहे. यात चेन्नईची मोठी पडझड झाली असून त्यांचे सात फलंदाज बाद झालेत. या सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन मराठीतून ट्विट करण्यात आले आहे. 


'आता कसं वाटतय?' अस ट्विट मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन केले आहे. या ट्विटवर एका चाहत्याने 'गार गार वाटतंय' अशी प्रतिक्रिया दिली. चेन्नई आणि मुंबईचा सामना असले त्यावेळी दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये अत्यंत चुरस असते. दोन्ही संघाचे चाहते एकमेकांची खेचण्यात अग्रेसर असतात. यंदाच्या आयपीएलमध्ये सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाला होता. त्यावेळी चेन्नईने मुंबईचा ५ विकेट्सनी पराभव केला होता. आजच्या सामन्यात मुंबईने चेन्नईची ८ बाद ८८ धावा अशी केली आहे. सध्या तरी मुंबई इंडियन्सने सामन्यावर पकड मिळवली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post