दसरा-दिवाळीपूर्वी एसबीआयचा ग्राहकांना खास संदेश



माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI)ने दसरा आणि दिवाळीपूर्वी एटीएमच्या नियमांत पुन्हा एकदा बदल केला आहे. नियम बदलल्यामुळे त्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होईल. जर तुम्ही SBI खातेदार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. एसबीआय एटीएमधून दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम काढायची असेल तर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी द्यावा लागेल. म्हणजेच आता एटीएमच्या पीनसह ग्राहकांना आपल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपीही टाकावा लागणार आहे.

एटीएमने वन टाइम पासवर्ड (OTP) आधारित एटीएम कॅश विड्रॉल सुविधा आता २४ तास लागू असण्याबाबत एसबीआय बँकेनं एक ट्वीट केले आहे. ग्राहकांना या ट्वीटमधून अलर्ट राहण्याचा सल्ला बँकेमार्फत देण्यात आला आहे.


ओटीपी सेवेद्वारे एटीएममधून पैसे मिळण्याची सुविधा सुरू केल्यानंतर ग्राहकांच्या खात्याची अधिक सुरक्षा होणार आहे. त्यामुळे यापुढे SBI च्या कोणत्याही एटीएममधून १० हजारांपक्षा जास्त रक्कम काढायची असल्यास तुमचा मोबाईल जवळ असणे आणि हा मोबाईल क्रमांक बँक खात्याला लिंक असणं गरजेचं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post