टाचांना भेगा पडल्या आहेत? मग घरीच तयार करा ‘हे’ आयुर्वेदिक तेल

 

माय अहमदनगर वेब टीम

हेेल्थ डेस्क - अनेकदा ऋतू बदलला की शारीरिक व्याधी डोकं वर काढू लागतात. यामध्येच हिवाळा सुरु झाल्यावर अनेकांच्या पायांना भेगा पडतात. थंडीच्या दिवसांमध्ये पायांची त्वचा रुक्ष होत असते. त्यामुळे मग पायांना भेगा पडणं, त्यातून रक्त येणं अशा अनेक समस्या जाणवायला लागतात. इतकंच नाही तर सतत पाण्यात किंवा चिखलात काम केल्यामुळेदेखील ही समस्या निर्माण होते. त्यामुळे ही समस्या टाळण्यासाठी अनेकदा महागडी औषधे, क्रीम वापरली जातात. परंतु, त्याने फारसा फरक पडत नसल्याची तक्रार अनेक जण करतात. म्हणूनच, यावर तोडगा म्हणून घरगुती उपाय करणं फायदेशीर ठरतं. यात घरीच तयार करता येणाऱ्यासारखी क्रीम कोणती ते पाहुयात.

साहित्य –

नैसर्गिक मेण -५० ग्रॅम

मोहरीचं तेल – १०० ग्रॅम

कापूर- १० ग्रॅम

कृती –

सर्वात प्रथम मोहरीचं तेल गरम करा आणि त्यात मेण टाकून ते वितळू द्या. मेण पूर्णपणे वितळल्यानंतर त्यात कपूर टाका. हे मिश्रण थोडा वेळ गरम झाल्यानंतर गॅस बंद करा. मिश्रण थंड झाल्यावर एका डबीत भरुन ठेवा. रोज रात्री झोपण्यापूर्वी हे तेल टाचांना नियमितपणे लावा.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post