सिरम करणार पाच लसींची निर्मिती

 


माय अहमदनगर वेब टीम

पुणे - जगभरातील सर्वात मोठी लसनिर्मिती करणारी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया एक नव्हे तर तब्बल पाच वेगवेगळ्या मानवी चाचणीच्या टप्प्यातील कोरोना लसीचे 100 कोटी डोस तयार करणार आहे. यात कोविशिल्ड, कोवोवॅक्स, कोविवॅक्स, कोवी-वॅक आणि कोवॅक्स या लसींंचा समावेश आहे, अशी  माहिती  सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी दिली.


ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्रॉझेनेका या फार्मास्यूटिकल कंपनीकडून विकसित करण्यात आलेल्या ‘कोविशिल्ड’ या लसीची सध्या तिसर्‍या टप्प्यातील मानवी चाचणी भारतात सुरू आहे. देशात 1 हजार 600 स्वयंसेवकांवर ही मानवी चाचणी झाली आहे. याबाबत अधिक माहिती देताना आदर पूनावाला म्हणाले, कोविशिल्डच्या लसीचे सध्या महिन्याला दोन ते तीन कोटी डोस तयार करण्यात येत आहेत.


2021 च्या शेवटी हे 100 कोटी डोस बनवण्यात येणार आहेत.  पुढे ही क्षमता महिन्याला 7 ते 8 कोटींवर नेणार आहे.  ही लस  नाशवंत होऊन नये म्हणून मुद्दाम थोड्या प्रमाणात निर्मिती करण्यात येत आहे. त्यानंतर 2021 च्या सुरुवातीपासून ‘नोवोवॅक्स’ कंपनीच्या भागीदारीतून ‘कोवोवॅक्स’ ही लस तयार करण्यात येणार आहे.


‘कोवोवॅक्स’ या लसीच्या मानवी चाचणीची सुरुवात मे महिन्यात ऑस्ट्रेलियात झाली असून, आता तिसर्‍या टप्प्यातील चाचणी या वर्षाच्या शेवटी 30 हजार स्वयंसेवकांवर होणार आहे. प्रत्येक तिमाहीत किमान एका नवीन लसीच्या डोसची निर्मिती करण्यात येणार आहे. लस निर्मितीसाठी ‘सिरम’च्या शेजारी एक स्वतंत्र वेगळा प्रकल्प सुरू करण्यात आला असून, तेथे लसींची निर्मिती केली जाणार आहे.


कोरोना 20 वर्षे राहण्याचा अंदाज


कोरोनाला रोखण्यासाठी लसनिर्मिती केली आणि जगात सर्वांना जरी लस दिली, तरी कोरोना पुढची किमान 20 वर्षे आपल्यात राहील, असे विधान सिरमचे सीईओ आदर पूनावाला यांनी केले आहे. त्यासाठी पुढची 20 वर्षे   लस लागेल. न्यूमोनिया, पोलिओ या आजारांचे उदाहरण देत त्या लसींची निर्मिती काही वर्षांपासून करण्यात आली तरी हे आजार सुरूच आहेत.  लस ही कोरोनावर रामबाण इलाज नसून, त्यामुळे या आजाराशी लढणार्‍या अँटिबॉडी विकसित होतात. या अँटिबॉडी 100 टक्के वाचवतील असे नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post