'नीट'चा निकाल जाहिर



माय अहमदनगर वेब टीम

औरंगाबाद - 

वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा नीट २०२० चा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीने शुक्रवारी सायंकाळी ऑनलाइन जाहिर करण्यात आला. परीक्षेनंतर निकालाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना निकाल जाहिर झाल्यानंतरही प्रतिक्षा करावी लागली. कारण सर्व्हर डाऊन असल्याने रात्री उशीरापर्यंत विद्यार्थ्यांना आपल्याच निकालासाठी मनस्ताप सहन करावा लागला.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा नियोजित वेळे ऐवजी परीक्षा उशीरा झाली. १३ सप्टेंबर रोजी देशभरात परीक्षा कोविड १९ साठी आवश्यक सुरक्षिततेचे नियम पाळत घेण्यात आली होती. तर वैद्यकीय कारणामुळे १३ सप्टेंबर रोजी जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाही. त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र तपासून अशा विद्यार्थ्यांची परीक्षा १४ ऑक्टोंबर रोजी घेतल्यानंतर शुक्रवार दि. १६ रोजी सायंकाळी ntaneet.nic.in या संकेतस्थळावर निकाल जाहिर करण्यात आला. या अधिकृत संकेतस्थळावर अॅन्सर की देखील देण्यात आली आहे. या नीट परीक्षेचा निकाल तीन वर्षांसाठी ग्राह्य धरण्यात येईल. तर संकेतस्थळावर तीन महिन्यांपर्यंत उपलब्ध असेल. विद्यार्थी आपला नीटचा निकाल १४ जानेवारी २०२१ पर्यंत डाऊनलोड करु शकतील. औरंगाबाद शहरातील ४८ परीक्षा केंद्रावर १५ हजार हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post