अहमदनगरमध्ये कोरोनाने घेतले 800 बळी

 


माय अहमदनगर वेब टीम
*अहमदनगर*: जिल्ह्यात आज ५४९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार २३७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.८९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ३०६ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २४०२ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ७६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८३ आणि अँटीजेन चाचणीत १४७ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २४,अकोले ०१,जामखेड ०१,  कर्जत ०१, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ०३, नेवासा १०, पारनेर ०६, पाथर्डी ०१, राहाता ०६, राहुरी ०३, संगमनेर १३, शेवगाव ०१, श्रीरामपूर ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ८३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा २८, अकोले ०६,  जामखेड ०३, नगर ग्रामीण ०७, नेवासा ०१, पारनेर ०१, पाथर्डी १५, श्रीगोंदा १५, श्रीरामपूर ०२, कॅंटोन्मेंट ०१, मिलिटरी हॉस्पिटल ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १४७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा १२, अकोले ०६, जामखेड २२, कर्जत १०,  कोपरगाव ०८, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०७, पारनेर ०८, पाथर्डी १६, राहाता १९, संगमनेर १६, शेवगाव ०९, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १२९, अकोले ३२, जामखेड ३०, कर्जत १७, कोपरगाव ११, नगर ग्रा. २०, नेवासा २३, पारनेर २२, पाथर्डी ६२, राहाता ३७, राहुरी २७, संगमनेर ८२, शेवगाव १४, श्रीगोंदा १८, श्रीरामपूर १८, मिलिटरी हॉस्पिटल ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:४९२३७*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:२४०२*

*मृत्यू:८०३*

*एकूण रूग्ण संख्या:५२४४२*

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post