युद्धासाठी सज्ज रहा, चीनच्या राष्ट्राध्यक्षांचे सैन्याला आदेश

 


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली -  पूर्व लडाख सीमेवर भारतीय आणि चिनी सैन्य आमने-सामने आहे. दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणावाची स्थिती आहे. या स्थितीच्या पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांना युद्धासाठी सज्ज रहाण्याचे आदेश दिले आहेत. देशाशी पूर्णपणे निष्ठावान रहा, असे जिनपिंग यांनी म्हटले आहे. शिन्हुआ या चिनी वृत्त संस्थेच्या हवाल्याने सीएनएनने हे वृत्त दिले आहे.जिनपिंग यांनी मंगळवारी गुआंगडोंग या चीनच्या लष्करी तळाला भेट दिली. प्रचंड सर्तक रहा आणि युद्धाच्या तयारीवर ऊर्जा केंद्रीत करा असे जिनपिंग यांनी आपल्या सैन्याला आवाहन केले. भारत, अमेरिका कि, अन्य कुठल्या देशासंदर्भात जिनपिंग यांनी हे वक्तव्य केले, ते अजून स्पष्ट झालेले नाही.कारण भारत, अमेरिका आणि दक्षिण चीन सागरातील अन्य देशांबरोबर चीनचा वाद सुरु आहे. चीनच्या भारताला लागून असलेल्या सीमेवर तर प्रचंड तणावाची स्थिती आहे. जून महिन्यात गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. त्यात भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचे ४० पेक्षा अधिक सैनिक ठार झाले. त्यानंतर पँगाँग टीएसओ सरोवर परिसरात गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. चीनची कुठलीही दादागिरी सहन न करता, भारतानेही प्रत्येकवेळी चीनला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. दक्षिण चीन सागरात अमेरिकेबरोबरही त्यांचा वाद सुरु आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post