पतीच्या हत्येची पत्नीनेच दिली 'सुपारी'माय अहमदनगर वेब टीम

नागपूर : पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीने त्याच्या हत्येची ५० हजारांत सुपारी दिली. ही पत्नी आणि तिच्या साथीदाराला केळवद पोलिसांनी अटक केली आहे. जयदीप लोखंडे (३९, रा. सावनेर) असे या प्रकरणातील मृतकाचे तर त्याची पत्नी देवका उर्फ कविता लोखंडे, चंदन नत्थू दियेवार (वय २८) आणि सुनील जयराम मालवीय (वय २७) अशी आरोपींची नावे आहेत. जयदीप मारहाण करतो, असे कविताने सांगितले. त्याला संपविण्यासाठी तिने चंदनला हाताशी धरले. जयदीपचा काटा काढण्यासाठी या दोघांनी सुनीलला ५० हजार रुपयांची सुपारी दिली. जयदीप आणि चंदन एकमेंकांना ओळखतात. याचा फायदा चंदनने घेतला. 'आज सुनीलचा वाढदिवस आहे, आपल्याला पार्टीसाठी शेतावर जायचे आहे', असे चंदनने जयदीपला सांगितले. ९ ऑक्टोबरला त्याला शेतात नेऊन त्याच्यावर चाकूहल्ला करण्यात आला. ग्रामीण गुन्हेशाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जिट्टावार आणि केळवद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश मट्टामी यांच्या चमूने केलेल्या एकत्रित कारवाईत या हत्येचा उलगडा झाला. पोलिसांनी कविता आणि चंदन यांना अटक केली. सुनील फरार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post