कोरोनाच्या भितीने 'हे' मंत्री घरात लपले



माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर: -कोरोनाच्या भितीने नगर जिल्हयातील तिनही मंत्री घरात लपून बसले. मात्र मी लोकाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी लोकाना या कोरोनाच्या संकटकाळात धीर देण्यासाठी लोकापर्यत पोहचत  आहे . या लोंकामुळे मला ऊर्जा मिळत असल्यामुळे आपल्याला कोरोना होणार नाही असा टोला माजी आमदार शिवाजी कर्डीले यांना बाळासाहेब थोरात , प्राजक्त तनपुरे, शंकरराव गडाख यांचे नाव न घेता लावला .

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने पोखडी, दहिगाव येथील शेतकऱ्यांना खेळते भांडवल चा चेक वाटप कार्यक्रम आयोजीत केला होता यावेळी ते बोलत होते . या कार्यक्रमासाठी बाजार समिती सभापती अभिलाष घिगे , उपसभापती  संतोष म्हस्के , खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुरेशराव सुंबे , दिलीप भालसिंग , बबनराव आव्हाड, भाऊसाहेब बोठे , जगन्नाथ मगर , इस्माईल शेख , राम साबळे , मधुकर म्हस्के , दादासाहेब दरेकर , श्रीकांत जगदाळे , महेश म्हस्के , अनिल ठोंबरे उपस्थित होते. यावेळी कडौले म्हणाले कोरोना काळात नागरिकाना या आजारावर उपचार करण्यासाठी सरकार अपयशी ठरले आहे.  कुठल्याही प्रकारचे नियोजन करता आले. प्रशासनावर तसेच रुग्णालयावर कुठलाही प्रकारचा वचक न ठेवल्यामुळे रुग्णालयात कोरोनाग्रस्ताकडून लाखो रुपायाची वसुली होत आहे. अशा परीस्थितीमुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला. या अडचणी तून बाहेर काढण्यासाठी जिल्हा बैंकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खेळते भांडवल उपलब्ध करून देण्याचे काम केले. यामुळे शेतकऱ्यांना चांगला आधार मिळाला.अशा काळात शेतकऱ्याना धीर देण्याची गरज असताना कोरोनाच्या भितीने नगर जिल्हयातील तिनही  मंत्री घरात लपून बसले. घर सोडायला तयार नाही असे या वेळी म्हणाले.  या कार्यक्रमासाठी शेंडी  पोखर्डी, पिंपळगाव उज्जनी , दहिगाव ,साकत , शिराठोण येथील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते .


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post