नागपूरला ७ डिसेंबरला विधिमंडळाचे अधिवेशन

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाचे मंगळवारी सूप वाजले . विधिमंडळाचे  हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपूरमध्ये होणार आहे.

अधिवेशन संस्थगित करण्याची घोषणा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ  यांनी केली. या सत्रात 9 तास 30 मिनीटांचे कामकाज झाले त्यापैकी 1 तास 10 मिनीटे वेळ तहकूबीमुळे वाया गेला. दोन दिवस सरासरी चार तास 40 मिनीटांचे कामकाज झाले. त्यामध्ये विधेयकांच्या कामकाजात सभेतील 1 1 आणि परिषदेतील 1 अशी एकूण बारा विधेयके मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post