सीमा ओलांडण्याची चूक करु नका, तैवानचा चीनला थेट इशारा

माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - तैवान आणि चीनच्या संबंधात कटूता आली आहे. तैवानचे उपराष्ट्रपती लाइ चिंग टे यांनी चीनला सरळ इशारा दिला आहे. आपल्या मर्यादा ओलांडण्याची चूक करु नका. आम्हाला शांतता हवी आहे. आम्ही आमच्या नागरिकांचे संरक्षण करू शकतो. हस्तक्षेप कराल तर वाईट परिणाम भोगावे लागतील, अशा शब्दांत तैवानने चीनला थेट इशारा दिला आहे. चीनची लढाऊ विमाने मागील काही आठवड्यांत तीन वेळा तैवानची सीमा ओलांडून आली आहेत. यामुळे भारत, जपान पाठोपाठ आता तैवानने चीनला इशारा दिला आहे.

तैवानचे लष्कर चीनच्या लढाऊ विमानांवर करडी नजर ठेवून आहे. याचबरोबर त्यांना त्यांच्या भाषेतच उत्तर देण्याची आमची तयारी असल्याचे तैवानने स्पष्ट केले आहे. अवघ्या सव्वा दोन कोटींची लोकसंख्या असणारा तैवान हा आमचाच प्रदेश असल्याचा दावा चीन नेहमी करत आला आहे. चीनच्या या कुरघोड्यामुळे तैवानमध्ये अशांतता निर्माण झाल्याचे उपराष्ट्रपती लाइ चिंग टे यांचे म्हणणे आहे. संपूर्ण जगाने एकत्र येऊन चीनला यासंदर्भात उत्तर द्यावे, असेही त्यांचे म्हणणे आहे.

मागील काही दिवसांपासून चीनच्या फायटर विमानांनी तैवान खाडीत प्रवेश करत आंतरराष्ट्रीय हवाई सीमांचे उल्लंघन केले. तैवानच्या या विमानांच्या हालचालींवर आमचे लक्ष आहे. या घटनांची आम्ही नोंद केली असल्याचे तैवानकडून सांगण्यात आले आहे. याचबरोबर अमेरिकेने मागच्या आठवड्यात गायडेड मिसाइल्स डेस्ट्रॉयर तैवानच्या खाडीमध्ये तैनात केले आहेत. अमेरिकेने कोणतीही पूर्व सूचना न देता हे पाऊल उचलले असल्याचे समजते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post