मराठा आरक्षणावर केंद्रानेही भूमिका न्यायालयात मांडावी : राजीव सातव


माय अहमदनगर वेब टीम

हिंगोली - मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या गाजत असून, यावर शून्य प्रहरात खा.राजीव सातव यांनी लक्ष वेधत मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यासोबतच केंद्रानेही आपली भूमिका न्यायालयात मांडावी, अशी मागणी केली. 

मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवावी, अशी मागणी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच खा.राजीव सातव यांनी राज्यसभेत केली. ते म्हणाले, मराठा समाजाला मोठ्या संघर्षानंतर आरक्षण मिळाले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आला आहे, त्यामुळे आरक्षण धोक्यात सापडल्याची स्थिती सर्वांसमोर आहे. 

यापूर्वी आरक्षणावर सुनावणीच्या वेळी केंद्र सरकारने आपली बाजू मांडली नव्हती. केवळ राज्य सरकारने बाजू मांडली. मात्र येणाऱ्या काळात सुप्रीमी कोर्टात सुरू असलेल्‍या सुनावणीत राज्यासह केंद्र सरकारनेही आरक्षणाच्या बाजूने मत मांडावे. जेणेकरून हे आरक्षण कायम राहील, अशी मागणी त्‍यांनी केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post