बॉलीवूडच्या ड्रग्ज संबंधांवरून गदारोळ

 


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - बॉलीवूडच्या कथित अमली पदार्थाच्या संबंधांवरून देशभरात चर्चा होत असताना त्याला संसदही अपवाद राहिली नाही. मंगळवारी राज्यसभेत या मुद्द्यावरून जोरदार घमासान झाले. अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी या संबंधांवरून बॉलीवूडच्या बदनामीचा प्रयत्न सुरू असून, काही जण ज्या ताटात खातात तिथेच थुंकत आहेत, हे चुकीचे आहे, असे प्रतिपादन केले. 

भाजप खासदार रविकिशन यांनी सोमवारी लोकसभेत अमली पदार्थ तस्करी वाढली असून, चीन, पाकिस्तानातून ड्रग्ज येत असल्याचे म्हटले होते. चित्रपट उद्योगातही याचा वापर होत असून त्यावर कारवाईची मागणी रविकिशन यांनी केली होती. रविकिशन यांच्या या वक्‍तव्यावर जया बच्चन बरसल्या. 

त्या म्हणाल्या की, चित्रपट उद्योग 5 लाख लोकांना थेट रोजगार देतो. मनोरंजन उद्योगातील लोकांना सोशल मीडियातून भडकावले जात आहे. या उद्योगात स्वतःचे नाव कमावणारे लोकच त्याला आता गटर संबोधू लागले आहेत. मी याच्याशी अजिबात सहमत नाही. आशा आहे सरकार अशा लोकांना या पद्धतीची भाषा वापरू नये, असे सांगेल. जया बच्चन म्हणाल्या, देशाची आर्थिक स्थिती ठीक नाही आणि अशा गोष्टींवरून लक्ष हटविण्यासाठीच आमचा वापर केला जात आहे. आम्हाला सरकारकडूनही पाठिंबा मिळत नाही. इंडस्ट्रीतील काही लोक सर्वाधिक कर भरतात; पण त्यांनाही त्रास दिला जात आहे. सरकारने मनोरंजन उद्योगाला पाठिंबा दिला पाहिजे. इंडस्ट्री नेहमीच सरकाच्या मदतीला धावली आहे. जेव्हा एखादी आपत्ती येते तेव्हा बॉलीवूडचे लोक पैसे देतात. काही लोक वाईट असतील म्हणून तुम्ही संपूर्ण इंडस्ट्रीची प्रतिमा डागाळू शकत नाही. 

रविकिशन यांच्यावर टीका

जया बच्चन म्हणाल्या, काल लोकसभेतील एक सदस्य, जे चित्रपट इंडस्ट्रीशी संबंधित आहेत, त्यांनीही इंडस्ट्रीविरोधात बोलणे लाजिरवाणे आहे. काही  लोक ज्या ताटात खातात तिथेच थुंकतात. हे चुकीचे आहे. हे दु:खद आहे. 

रविकिशन यांचा पलटवार 

दरम्यान, भाजप खासदार आणि अभिनेते रविकिशन म्हणाले की, जयाजी माझ्या वक्‍तव्यांचे समर्थन करतील, अशी आशा होती. इंडस्ट्रीत सर्वजण ड्रग्ज सेवन करीत नाहीत. मात्र, जे करतात ते या सर्वात मोठ्या चित्रपट उद्योगाला संपविण्याच्या योजनेचा भाग आहेत. जयाजी आणि मी इंडस्ट्रीत आलो तेव्हा अशी स्थिती नव्हती. मात्र, आता या उद्योगाचे संरक्षण करणे गरजेचे आहे आणि मी खाल्लेल्या ताटात थुंकत नाही. बॉलीवूडच्या ड्रग्ज माफियांविषयी मी बोललो होतो. जय्या बच्चन यांच्या वक्‍तव्याने मी हैरान झालो आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post