भारतात तीन लसी चाचणीच्या टप्प्यात

 


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - भारतात कोरोनावरील तीन लसी या चाचणीच्या टप्प्यात आहेत. कोरोनाविरोधातील लढ्यात भारत लवकरच निर्णायक वळण घेणार आहे, असा दिलासा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिला. ते म्हणाले, की कॅडिला आणि भारत बायोटेकने आपापल्या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण केल्या आहेत. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने फेज 2 बी 3 चाचणी पार केली आहे. सिरमची आता तिसर्‍या टप्प्यातील चाचणी सुरू आहे, असेही डॉ. भार्गव यांनी सांगितले. एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


अमेरिकेसह काही युरोपियन देशांमध्ये कोरोनाची मोठी साथ आली होती. नंतर ती कमी झाली आणि मग पुन्हा तिथे दुसरी लाट आली. आपण यातून धडा घेतला पाहिजे. सुरुवातीला लॉकडाऊनची अंमलबजावणी कठोर पद्धतीने केल्याचा आपल्याला फायदाच झाला, असेही डॉ. भार्गव यांनी स्पष्ट केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post