गुरुवारी 11,514 नवीन रुग्णांची नोंद तर 316 मृत्यू; एकूण आकडा 4.79 लाखांवर


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज्यात गुरुवारी 11,514 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा 4,79,779 झाला आहे. तसेच, गुरुवारी झालेल्या 316 मृत्यूसोबत एकूण मृतांचा आकडा 16,792 झाला आहे. चांगली बाब म्हणजे, गुरुवारी राज्यात 10,854 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यासोबतच 3,16,375 रुग्ण बरे झाले असून, 1,46,305 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

खासदार नवनीत कौर राणा यांच्या पाठोपाठ रवी राणाही कोरोना पॉझिटिव्ह

खासदार नवनीत कौर राणा यांच्यापाठोपाठ त्यांचे पती आमदार रवी राणा यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यासोबतच राणा कुटुंबातील बारा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. यामध्ये राणा दाम्पत्याच्या दोन लहान मुलांसह रवी राणा यांच्या आई-वडिलांचा समावेश आहे. राणा कुटुंबावर सध्या नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post