जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा शुक्रवार



माय अहमदनगर वेब टीम
शुक्रवार 7 ऑगस्ट रोजी दिवसाची सुरुवात पूर्व भाद्रपदा नक्षत्रामध्ये होत असून आजच्या दिवशी सुकर्मा नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला. तर उर्वरीत 6 राशीच्या लोकांसाठी धावपळीचा ठरू शकतो.

तुमच्या राशीनुसार, असा राहील आजचा दिवस

मेष : शुभ रंग : मरून | अंक : ७
जास्त वेळ घराबाहेरच जाईल. बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. गृहिणींना आज शेजारधर्म पाळावे लागतील.

वृषभ : शुभ रंग : क्रीम | अंक : ८
काही दुरावलेल्या हितसंबंधांत सुधारणा होईल. पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. छान दिवस.

मिथुन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६
तरुणांनी मौजमजा करताना नीतिमत्तेचे भान ठेवावे. उद्धटपणास लगाम गरजेचा. आवक पुरेशी असली तरी आज बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील.

कर्क : शुभ रंग : हिरवा | अंक : ५
अधिकारांचा दुरुपयोग टाळावा. व्यवसायात स्पर्धेस तोंड देण्यासाठी अथक परिश्रमांची तयारी हवी.

सिंह : शुभ रंग : पिस्ता| अंक : २
कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील.विवाहाविषयी बोलणी करायची असतील तर आजचा दिवस योग्य.

कन्या : शुभ रंग : तांबडा| अंक : ४
नोकरीच्या ठिकाणी आज वाढीव जबाबदाऱ्या टाळून चालणार नाहीत. आज तब्येतीकडे दुर्लक्ष होणार आहे.

तूळ : शुभ रंग : आकाशी | अंक : १
महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार अाहे.आज तुमचा अाध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील.

वृश्चिक : शुभ रंग : पांढरा | अंक : ३
कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाका. नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेवू नका. ताकही फुंकून प्या.

धनू : शुभ रंग : जांभळा | अंक : ३
व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस. दुकानदारांच्या गल्ल्यात वाढ होईल. वैवाहिक जीवनात गोडीगुलाबी असेल.

मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : ९
नोकरीत हाताखालच्या माणसांशी जुळवून घ्यावे लागेल. अती आक्रमकता नुकसानीस कारणीभूत होईल.

कुंभ : शुभ रंग : राखाडी | अंक : १
उच्चशिक्षणार्थींच्या अपेक्षा वाढतील. एखाद्या नवीन विषयात गोडी निर्माण होईल. विलासी वृत्ती बळावेल.

मीन : शुभ रंग : चंदेरी | अंक : ५
कौटुंबिक जीवन समाधानी असेल. तुम्ही कार्यक्षेत्रातही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. आज पैशांची कमतरता भासणार नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post