भाजपच्या निमंत्रणाचे अण्णांनी काढले वाभाडे

 


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर -  दिल्लीतील केजरीवाल सरकारविरोधात आंदोलनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना निमंत्रण देणे भाजपला चांगलेच महागात पडले आहे. अण्णांनी निमंत्रणाला पत्राद्वारे उत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे वाभाडे काढले आहे. अण्णांच्या या पत्राचा आधार घेत माध्यमांकडून त्यावर केंद्रातील भाजप सरकारविरोधात विश्‍लेषण केले जात आहे. केंद्र सरकारचे भ्रष्टाचाराविरुद्ध करत असलेल्या कारवाईचे दावे निष्फळ ठरत असल्याचे दिसते आहे.

दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी दिल्लीतील केजरीवाल सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांच्याविरुद्ध आंदोलन करण्यासाठी अण्णा हजारे यांनी दिल्लीत येऊन भाजपला साथ देण्याची विनंती केली होती. तसे पत्र हजारेंना मिळाल्यावर त्यांनी गुप्ता यांना पत्र रुपानेच उत्तर पाठवले असून, दिल्ली भाजपच्या आंदोलनाचे नेतृत्व करण्यास स्पष्ट नकार देताना, केंद्रातील मागील सहा वर्षांपासूनच्या भाजप सरकारवर टीकाही केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post