...तर आयुक्तांच्या दालनात आंदोलन

 


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर नगर मनपा हद्दीतील औरंगाबाद रस्त्यावरील नटराज हॉटेल, पितळे जैन बोर्डिंग व न्यू आर्टस् कॉलेजच्या वसतिगृहातील प्रस्तावित कोविड सेंटर तातडीने सुरू करावे, अशी मागणी मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी केली आहे. यावर त्वरित कार्यवाही न झाल्यास आयुक्तांच्या दालनात आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. बारस्कर यांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे.

कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या पाहता रुग्णालयांमध्ये बेड कमी पडत आहेत. त्यामुळे पॉझिटीव्ह रिपोर्ट आलेल्या रुग्णांना दाखल होताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. औरंगाबाद रस्त्यावरील नटराज हॉटेल, पितळे जैन बोर्डिंग व न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या होस्टेलमध्ये कोविड सेंटर सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. परंतु अद्याप याबाबत कार्यवाही झालेली नाही. वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करून या तिन्ही ठिकाणचे सेंटर तातडीने कार्यान्वित केल्यास नगरकरांची गैरसोय दूर होईल, असे निवेदनात म्हटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post