लोकल रेल्वेला सप्टेबरपर्यंत मुहुर्त नाहीच?

 

माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रेल्वे मंत्रालयाने 12 ऑगस्टपर्यत लोकल, मेल-एक्सप्रेसची वाहतुक बंद ठेवली होती. आता पुढे काय याची उत्सुकता असतानाच 30 सप्टेंबरपर्यंत रेल्वेची सेवा बंद राहणार असल्याचे इस्टर्न रेल्वेचे पत्र सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्याने, संभ्रमावस्था निर्माण झाली. मात्र रेल्वे बोर्डाने या पत्रकाबाबत कानावर हाथ ठेवले आहेत. 

परिणामी रेल्वे बोर्डाने 11 मे रोजी घेतलेल्या निर्णयात पुढील सुचना मिळेपर्यत रेल्वेच्या विशेष सेवा वगळता इतर सार्वजनिक प्रवासी सेवा बंद राहणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे 12 ऑगस्टनंतरही लोकल,मेल-एक्सप्रेसची वाहतुक बंदच राहणार असल्याचे स्पष्ट होत असले तरी नेमकी कधीपर्यत सेवा बंद राहणार हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 22 मार्चपासुन देशातील रेल्वेची प्रवासी वाहतुक पुर्णपणे बंद आहे. 1 मे पासून विविध राज्यात अडकलेल्या मजुरांच्या घरवापसीकरिता श्रमिक ट्रेन,12 मे पासून  देशातील निवडक 15 मार्गावर राजधानी स्पेशल ट्रेन तर आणि 1 जूनपासुन 200 स्पेशल ट्रेन चालविण्यात येत आहेत. तसेच मुंबई शहरातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठी  15 जूनपासुन मर्यादित लोकल सेवा सुरु आहे. अत्यावश्यक कर्मचार्यांकरिता मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसाला 700  फेर्‍या चालविण्यात येत आहेत. 

इस्टर्न रेल्वेचे एक पत्र व्हायरल

सोमवारी पुन्हा रेल्वेची देशभरातील सेवा रद्द करण्यात आल्याची चर्चा सोशल माध्यमांवर सुरू आहे. यामध्ये 30 सप्टेंबरपर्यंतची रेल्वे सेवा रद्द झाली असून, त्यासंबंधीत इस्टर्न रेल्वेचे एक पत्र सुद्धा व्हायरल झाले आहे. मात्र, मध्य रेल्वेने असे पत्रच निघाले नसून, कोणत्याही प्रकारच्या नविन सुचना रेल्वे मंत्रालयाने दिल्या नसल्याचे ट्विट देखील रेल्वे मंत्रालयाने स्वत: केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post