गुळाचे हे आहेत मोठे फायदे ; या आजारापासून राहता येईल दूर

 

माय अहमदनगर वेब टीम

हेेल्थ डेस्क - आहारात कोणतेही गोड पदार्थ खातो तेव्हा त्यात हमखास साखरेचा वापर केलेला दिसून येतो. काही पदार्थात गुळाचा वापर केला जातो. पण साखरेच्या तुलनेत गुळाचे अनेक फायदे आहेत. आहारातून जर साखर वगळून आपण गुळाचा समावेश केला तर होत असलेल्या आजारांपासून सुटका मिळवता येईल. सगळ्यात मह्त्वाचं म्हणजे  गुळाचं सेवन केल्याने एन्ड्रोफिन्स हा हॅपी हार्मोन जनरेट होत असतो.  त्यामुळे आनंदी राहण्यासाठी आणि मुड चांगला ठेवण्यासाठी गुळाचा आहारात समावेश असाव. साखरेच्या सेवनाच्या तुलनेने अनेक फायदे याचं सेवन केल्यामुळे शरीराला होत असतात. 

भारतात ऊसापासून तयार केले जाणारे गुळ आणि साखर हे पदार्थ मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. गुळापासून तयार करण्यात येणारे पदार्थ खाल्यामुळे शरीरातील पचनक्रिया व्यवस्थित राहते. जेवणानंतर गुळाचा एक खडा खाल्ल्यास पाचनशक्ती सुधारते. घसा खवखवत असल्यास गुळाचा खडा खल्ल्याने आराम मिळतो.

पोटासंबंधी विकार दूर होतात

पोटासंबंधीच्या अनेक आजारांत गुळ खूप फायद्याचा ठरतो. गुळ खाल्ल्यामुळे मुळे आपले पचन तंत्र सुधारते. जेवल्यानंतर गुळ खाल्ल्याने पचनक्रिया आणखी चांगली होते. डॉक्टर गर्भवती स्त्रियांना देखील गुळ खाण्याचा सल्ला देतात. कारण अनेकदा त्यांना पोट साफ होण्यास त्रासाचा सामना करावा लागतो.

वजन कमी करण्यासाठी 

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर साखरेच्या चहाचं सेवन न करता  वजन कमी करण्यासाठी गुळाच्या चहाचं सेवन करू शकता. त्यामुळे तुमचं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल.

दम्याच्या त्रासापासून सुटका

थंडीमध्ये दम्याच्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. ऑक्सिजनची कमतरता आणि वाढत्या प्रदुषणामुळे श्वास घेण्यास दम्याच्या रुग्णांना त्रास होतो. अशावेळी त्यांच्या शरीरात उष्णता कायम राहावी व कफ बाहेर पडण्यास मदत व्हावी यासाठी रोज दूध व गुळाचे सेवन करणे फायदेशीर ठरेल.  


मधूमेहासाठी फायदेशी

मधुमेहावर गुणकारी गूळ- गूळ साखरेच्या तुलनेत खूप फायदेशीर आहे. गुळामध्ये कॅल्शियम आणि लोह जास्त प्रमाणात असल्यामुळे शरीरात साखरेचे प्रमाण संतुलित राहते. 


मासिकपाळीचा त्रास कमी होतो

मासिकपाळी दरम्यान अनेकांना पोटदुखीच्या त्रासाने ग्रस्त असतात. ह्या त्रासातून मुक्तता मिळविण्यासाठी तुम्ही गुळाचे सेवन करू शकता. गुळ खाल्ल्याने पोट दुखीचा त्रास कमी होतो. तसंच गुळाचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरात आयर्नची कमतरता भासत नाही. तसंच एनिमियामुळे त्रासलेल्यांसाठी गूळ खूप फायदेशीर आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post