माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क -
दुधीभोपळ - यात भरपूर मात्रेत फायबर असतं आणि फॅट्सची मात्रा नगण्य असते. जर आपण आहारात दुधीभोपळ्याचे अधिक सेवन केले तर याचे परिणाम दिसून येतील.
कोबी - यात टारटेरिक अॅसिड आढळतं जे शरीरातील अतिरिक्त चरबी दूर करतं. आपण खूप गोड खात असल्यास फॅट लेवल वाढतं पण कोबी गोड पदार्थांना फॅट्समध्ये परिवर्तित होण्यापासून रोखते.
टोमॅटो - टोमॅटोमध्ये आढळणारे व्हिटामिन सी शरीरात इम्यून सिस्टमला हेल्थी बनवतं. वजन कमी करण्यात हे फार उपयोग आहेत.
पपई - पपई खाल्ल्याने गॅससंबंधित तक्रार दूर होते. पपई शरीरातील पचन तंत्राला दुरुस्त ठेवतं. वजन कमी करण्यासाठी रोज पपई खायला हवी.
बडीशेप - जेवण झाल्यावर बडीशेप खाणे लाभकारी आहे. याने जेवण पचतं. जेवण्यापूर्वी बडीशेप टाकलेली चहा प्यायल्याने भूक कमी लागते आणि आपण अती आहारा घेण्यापासून वाचतो.
पाणी - जेवण्यापूर्वी योग्य मात्रेत पाणी पिण्याने वजन नियंत्रित राहतं. पाणी पोटात जागा बनवून घेतं ज्याने आपण अती आहार सेवन करण्यापासून वाचतो. पण जेवण झाल्यावर पाणी पिणे टाळावे.
हळद - रोज सकाळी रिकाम्या पोटी एक लहान चमचा हळद कोमट पाण्यासोबत सेवन करावी. याने वजन नियंत्रित राहील. याने इन्फेक्शन आणि इतर संभाव्य धोके टळतील.
Post a Comment